Sant Eknath: नाथांच्या घरी देवाने 12 वर्षे भरले पाणी, पैठणमधील ऐतिहासिक वाडा तुम्ही पाहिला का?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Sant Eknath: पैठण नगरीत संत एकनाथ महाराजांचा सव्वा चारशे वर्षांपूर्वीचा एक ऐतिहासिक वाडा आहे. महाराजांचे अकरावे वंशज रघुनाथ बुवा पालखीवाले यांच्याकडून याबाबत जाणून घेऊ.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील पैठण हे ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी नाथांच्या दर्शनासाठी येत असतात. या पैठण नगरीतच संत एकनाथ महाराजांचा सव्वा चारशे वर्षांपूर्वीचा एक ऐतिहासिक वाडा देखील आहे. याच ऐतिहासिक वाड्याबाबत संत एकनाथ महाराजांचे अकरावे वंशज रघुनाथ बुवा पालखीवाले यांनी लोकल 18 सोबत बोलतांना सांगितले.
पैठण येथे संत एकनाथ महाराजांनी सव्वा चारशे वर्षांपूर्वी एक वाडा बांधला होता, या वाड्यात त्यांचे संपूर्ण जीवन गेले. या ऐतिहासिक वाड्यात काही पुरातन वस्तू पाहायला मिळतात. या ऐतिहासिक वाड्यात सर्वात खास गोष्ट म्हणजे रांजण आणि दोन खांब आहेत. उद्धव खांब आणि पुराण खांब अशी त्यांची नावे आहेत. तर रांजणात संत एकनाथ महाराजांच्या घरी देवाने दहा वर्ष पाणी भरले, व पुराण खांबाला टेकून नाथ महाराज भागवत सांगायचे, असे रघुनाथ बुवा सांगतात.
advertisement
देवाने नाथ महाराजांना दर्शन देऊन देव उद्धव खांबात गुप्त झाले, ही गोष्ट नाथांच्या भक्तीची आणि श्रद्धेची साक्ष देते, असे देखील येथील जाणकार सांगतात. 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी सेवा केल्यानंतर देव गुप्त झाल्याचे सांगितले जाते. हा वाडा केवळ जुनी इमारत नसून तो संत एकनाथांच्या भक्ती, ज्ञान आणि त्यांच्या दैवी अनुभवांचे ऐतिहासिक ठिकाण मानले जाते.
advertisement
पैठण येथील वाड्यात असणाऱ्या वस्तू आणि खांब महान संतांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांशी जोडलेल्या आहेत. हा वाडा आपल्याला भूतकाळातील त्या पवित्र क्षणांची आठवण करून देतो. सध्या रघुनाथ बुवा पालखीवाले या वाड्याची सेवा करत आहेत.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
June 06, 2025 4:16 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Sant Eknath: नाथांच्या घरी देवाने 12 वर्षे भरले पाणी, पैठणमधील ऐतिहासिक वाडा तुम्ही पाहिला का?

