Ashadhi Wari: पाऊले चालती...! नाथांची पालखी चांदीच्या रथातून पंढरीला जाणार, मुक्काम आणि रिंगण कुठं असणार?
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीनिमित्त पैठणहून संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे आज पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. पायी दिंडीतील मुक्काम आणि रिंगण याबाबत जाणून घेऊ.
छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आपल्या विठूरायला भेटण्यासाठी हजारो मैलांचा प्रवास करत पंढरपूर गाठतात. याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील श्री संत एकनाथ महाराज यांच्या पायी दिंडीचे आषाढी एकादशीसाठी बुधवार, 18 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गस्थ होईल.
संत एकनाथ महाराज यांच्या पालखीसाठी यंदा चांदीचा रथ असणार आहे. ही पालखी पंढरीच्या वाटेने विविध ठिकाणी मुक्कामी असणार असून 5 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचणार आहे. श्री संत एकनाथ महाराज यांच्या सोहळ्याचा पहिला मुक्काम पैठण हद्दीतील चनकवाडी या गावी राहणार आहे. दुसऱ्या दिवशी पालखी दिंडी सोहळा अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश करेल. याच पालखी सोहळ्याचा मार्ग आणि रिंगण याबाबत जाणून घेऊ.
advertisement
असा असेल प्रवास (मुक्काम)
18 जून बुधवार – चनकवाडी,
19 जून गुरुवार - हदगाव,
20 जून शुक्रवार – कुंडलपारगाव,
21 जून शनिवार – मुंगसवाडे,
22 जून रविवार – राक्षसभुवन,
23 जून सोमवार – रायमोह,
24 जून मंगळवार - पाटोदा,
advertisement
25 जून बुधवार – दिघोळ
26 जून गुरुवार - खर्डा,
27 जून शुक्रवार - दांडेगाव,
28 जून शनिवार - अनाळे,
29 जून रविवार -परांडा,
30 जून सोमवार -बिटरगाव,
1 जुलै मंगळवार - कुर्डू,
2 जुलै बुधवार - अरण,
3 जुलै गुरुवार – करकंब,
4 जुलै शुक्रवार – होळे,
5 जुलै शनिवार -पंढरपूर मुक्कामी पालखी पोहोचेल.
advertisement
या ठिकाणी होणार रिंगण
श्री संत एकनाथ महाराजांचा पालखीचे पहिले रिंगण 21 जून म्हणजे शनिवारी मिडसांगवी या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर पालखीचे दुसरे रिंगण बुधवारी 25 जून रोजी पारगाव घुमरे या ठिकाणी होईल. तिसरे रंगणे शनिवारी म्हणजेच 28 जून रोजी नागरडोह या ठिकाणी होणार आहे. 1 जुलै रोजी चौथे रिंगण हे कव्हेदंड या ठिकाणी होईल. तर 5 जुलै रोजी उभे रिंगण आणि पादुका आरती पंढरपूरला होणार आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jun 18, 2025 2:09 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ashadhi Wari: पाऊले चालती...! नाथांची पालखी चांदीच्या रथातून पंढरीला जाणार, मुक्काम आणि रिंगण कुठं असणार?







