Supermoon 2024: रक्षाबंधनाच्या दिवशी दिसणार ब्लू सुपरमून, किती दिवसांनी सूर्यग्रहण होईल?
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
Supermoon 2024: आज रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे. वर्षातील पहिला सुपरमून देखील याच दिवशी दिसणार आहे. मात्र आज सूर्यग्रहण असल्याचे अनेकांना वाटते.
आज रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे. वर्षातील पहिला सुपरमून देखील याच दिवशी दिसणार आहे. मात्र आज सूर्यग्रहण असल्याचे अनेकांना वाटते.
आज कोणतेही ग्रहण होत नाही. वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. जाणून घ्या हे ग्रहण भारतात दिसणार की नाही आणि या ग्रहणाची वेळ काय असेल.
Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनादिवशी भ्रदाकाल, राखी कधी आणि कशी बांधावी?
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. ज्याला रिंग ऑफ फायर असेही म्हणतात. चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण होते. त्यामुळे सूर्याचा बाह्य भाग अंगठीच्या रूपात चमकताना दिसतो.
advertisement
सूर्यग्रहण किती वाजता होईल?
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 9:13 वाजता सुरू होईल आणि 3 ऑगस्ट रोजी पहाटे 3:17 वाजता समाप्त होईल. हे कंकणाकृती सूर्यग्रहण 6 तास 4 मिनिटांचे असेल.
सूर्यग्रहण भारतात दिसणार की नाही?
हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही कारण यावेळी रात्र असेल. मिळालेल्या माहितीनुसार, हे ग्रहण ब्राझील, मेक्सिको, होनोलुलू, कुक आयलंड, फिजी, उरुग्वे, अंटार्क्टिका, न्यूझीलंड, चिली, पेरू, आर्क्टिक, ब्यूनस आयर्स आणि बेका बेटावर होईल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 19, 2024 10:49 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Supermoon 2024: रक्षाबंधनाच्या दिवशी दिसणार ब्लू सुपरमून, किती दिवसांनी सूर्यग्रहण होईल?