Religious: देवदर्शन, पूजा-अभिषेक केल्यानंतर प्रसादाच्या नारळाचं काय करावं? अनेकजण चुकतात
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Reported by:Virendrasigh Utpat
Last Updated:
Religious: नारळ किंवा श्रीफळ हे देवी लक्ष्मीचं रुप मानलं जातं. त्यामुळेच पूजा किंवा धार्मिक कार्याचा संकल्प पूर्ण झाल्यानंतर गुरुजी यजमान आणि उपस्थितांना आशीर्वाद म्हणून नारळ देतात.
मुंबई, 24 जानेवारी : हिंदू धर्मामध्ये नारळ या फळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठल्याही देवाची पूजा असेल तर त्याला नारळ अर्पण केला जातो. नवीन वाहन खरेदी केलं तरी त्याची पूजा करुन नारळ वाढवला जातो. हिंदू धर्मातलं कुठलंही शुभकार्य नारळाशिवाय पूर्ण होत नाही. एखाद्या मंदिरात जाऊन पूजाअर्चा किंवा अभिषेक केला तरी त्याचा प्रसाद म्हणून सहसा नारळ दिला जातो. नारळालाच ‘श्रीफळ’ असंही म्हणतात. आपण कुठल्याही कारणाने देवदर्शन किंवा पूजा, अभिषेक केल्यानंतर प्रसाद म्हणून मिळालेल्या नारळाचं नक्की काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडतो का?
नारळ किंवा श्रीफळ हे देवी लक्ष्मीचं रुप मानलं जातं. त्यामुळेच पूजा किंवा धार्मिक कार्याचा संकल्प पूर्ण झाल्यानंतर गुरुजी यजमान आणि उपस्थितांना आशीर्वाद म्हणून नारळ देतात. अनेकदा असा आशीर्वाद म्हणून मिळालेला नारळ फोडून तो प्रसाद मानून खायचा की न फोडता तो नारळ सांभाळून ठेवायचा, असा प्रश्न भक्तांना पडतो.
पंडित राजेंद्र तिवारी यांच्या मते असा नारळ देवाला अर्पण करावा आणि त्याचा प्रसाद करुन तो सगळ्यांना वाटून आपणही खावा. त्यामुळे त्या नारळाचा मान राखला जाईल आणि सगळ्यांना त्या प्रसादाचा लाभही मिळेल. कधीकधी चुकून असा नारळ घरातील इतर नारळांमध्ये ठेवला जातो आणि कळत नकळतपणे तो दुसऱ्या कुणाला दिला जातो. पंडित तिवारी सांगतात, तुम्हाला आशीर्वाद म्हणून मिळालेला नारळ तुम्ही इतरांना देणं म्हणजे तुम्हाला मिळालेला आशीर्वादच तुम्ही त्यांना देण्यासारखं आहे. ते एक प्रकारे त्या नारळाचा आणि तो देणाऱ्याचा अपमान करणं आहे. त्यामुळे नकळतपणेही अशी चूक करु नका.
advertisement
आशीर्वाद स्वरुपात मिळालेला नारळ तुम्हाला सांभाळून ठेवायचा असेल तर त्यासाठीही काही पर्याय आहेत. असा नारळ लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडात गुंडाळून तो लॅाकरमध्ये जपून ठेवू शकता. लॅाकरमध्ये ठेवायचा नसेल तर लाल कापडामध्ये गुंडाळलेला नारळ घराच्या मुख्य दरवाज्यावर टांगून ठेवू शकता. तसं केल्यामुळे देव-देवतांचे आशीर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी सतत तुमच्यावर राहील.
advertisement
पूजा किंवा अभिषेक यांसारखं कुठलंही धार्मिक कार्य पूर्ण केल्यानंतर काही आशीर्वचनांचं पठण करुन गुरुजी नारळ तुम्हाला देतात. त्याचं महत्त्व तो नारळ जपून ठेवण्यात किंवा प्रसाद म्हणून ग्रहण करण्यात आहे, हे ओळखा आणि त्याप्रमाणे कृती करा असं धर्मशास्त्रांतील जाणकारांचं सांगणं आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 24, 2024 3:38 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Religious: देवदर्शन, पूजा-अभिषेक केल्यानंतर प्रसादाच्या नारळाचं काय करावं? अनेकजण चुकतात


