आज धनत्रयोदशी, या वस्तू चुकूनही खरेदी करू नका, शनिदेव होतील नाराज, काय खरेदी कराल?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
धनत्रयोदशीला खरेदी करताना काळजी घ्यायला हवी. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शनिदेव नाराज होऊ नये, ही काळजी तुम्ही घ्यायला हवी.
सच्चिदानंद, प्रतिनिधी
पाटणा, 10 नोव्हेंबर : आज धनत्रयोदशी आहे. यामुळे अनेक जण विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करतील. जर तुम्हीही काही खरेदी करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही चुकीची वस्तू खरेदी केली तर शनिदेव तुमच्यावर नाराज होतील आणि वर्षभर तुम्हाला त्याची शिक्षा भोगावी लागेल.
धनत्रयोदशीला खरेदी करताना काळजी घ्यायला हवी. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शनिदेव नाराज होऊ नये, ही काळजी तुम्ही घ्यायला हवी. पाटण्याचे प्रसिद्ध ज्योतिषविद् डॉ. श्रीपति त्रिपाठी यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, घुबडावर स्वार झालेली लक्ष्मीची मूर्ती कधीही घरात आणू नये. त्यामुळे घरात गरिबी शिरते.
advertisement
चुकूनही या गोष्टी खरेदी करू नका -
ज्योतिषविद् डॉ.श्रीपति त्रिपाठी म्हणाले की, धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये अमृत आणणाऱ्या वस्तू खरेदी करा. इस्त्री, फाटलेले कापड, काळे कपडे इत्यादी कोणतेही साहित्य खरेदी करू नका. जास्त कपडे खरेदी करू नका. अशा वस्तू खरेदी करा, ज्यामुळे तुमच्या घरात धनसंपत्ती वाढेल. नुकसान होण्याची शक्यता आहे, तिथे गुंतवणूक करू नका. ज्यामध्ये लक्ष्मी माता कमळाच्या फुलावर विराजमान तीच मूर्ती आणा. चुकूनही घुबडावर बसलेल्या लक्ष्मी मातेची मूर्ती आणू नका, असेही ते म्हणाले.
advertisement
कोणत्या गोष्टी खरेदी कराव्या -
घरात धनसंपत्ती यावी, अशा वस्तू धनत्रयोदशीला खरेदी केल्या जातात. यादिवशी सोने-चांदी खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. यावेळी दान-पुण्य केल्याने शुभ फळाची प्राप्ती होते. या दिवशी धणे खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास राहतो.
धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पंचद्रव्य खरेदी केल्याने संपत्ती तेरा पटींनी वाढते. तर लक्ष्मी, गणेशमूर्ती, धणे, हळदी गाठ, मातीची भांडी, सोने, चांदी, पितळ, तांबे, अष्टधातूची भांडी, सजावटीच्या वस्तू, जमीन-इमारती, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कराव्यात, असेही ते म्हणाले.
Location :
Patna,Bihar
First Published :
November 10, 2023 10:11 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
आज धनत्रयोदशी, या वस्तू चुकूनही खरेदी करू नका, शनिदेव होतील नाराज, काय खरेदी कराल?