जया किशोरींमुळे प्रभावित, शेतकऱ्याची मुलगी झाली कथावाचिका!, कोण आहेत अलका किशोरी?

Last Updated:

अलका किशोरी यांनी सांगितले की, जीवन यशस्वी करण्यासाठी अध्यात्म हा एकमेव मार्ग आहे. सध्या तरुणांमध्ये नैराश्य आणि निराशा आहे. ते चुकीच्या मार्गावर जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना योग्य मार्गावर चालण्याचा मार्ग फक्त अध्यात्मच दाखवते.

जया किशोरी-अलका किशोरी
जया किशोरी-अलका किशोरी
शशिकांत ओझा, प्रतिनिधी
पलामू : महर्षि वेद व्यास रचित 18 पुराणांमध्ये एक म्हणजे श्रीमद्भागवत. श्रीमद्भागवत कथावाचिका जयाकिशोरी हे नाव देशभरात प्रसिद्ध आहे. त्यांना प्रभावित होऊन एका शेतकऱ्याची मुलगीही कथावाचिका झाल्या आहेत. अलका किशोरी असे या कथावाचिका यांचे नाव आहे. अलका किशोरी कोण आहेत, हे जाणून घेऊयात.
अलका किशोरी या सध्या बिहारमधील पलामू येथे आल्या आहेत. पलामू येथे सात दिवसीय भागवत कथा ज्ञान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. मेदिनीनगरच्या तुलसी मानस मंदिराच्या मैदानात या कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
advertisement
यावेळी लोकल18 च्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, वृंदावन येथे राहणाऱ्या अलका किशोरी या शेतकऱ्याची कन्या आहेत. त्यांना लहानपणापासूनच भजन कीर्तनाची आवड होती. सहावीत असताना त्यांनी पहिल्यांदा भजने गायली होती. वयाच्या 16 व्या वर्षी कथा सांगायला सुरुवात केली. आत्तापर्यंत त्यांनी राजस्थान, गुजरात आणि झारखंडसह 150 हून अधिक ठिकाणी त्यांनी कथावाचनाचे कार्यक्रम केले आहेत.
advertisement
अलका किशोरी यांनी सांगितले की, जीवन यशस्वी करण्यासाठी अध्यात्म हा एकमेव मार्ग आहे. सध्या तरुणांमध्ये नैराश्य आणि निराशा आहे. ते चुकीच्या मार्गावर जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना योग्य मार्गावर चालण्याचा मार्ग फक्त अध्यात्मच दाखवते. अध्यात्माशी जोडून तुम्ही तुमचे जीवन त्याच्या गंतव्यस्थानावर नेऊ शकता.
त्यांनी एका श्लोकाच्या माध्यमातून सांगितले की, “जनम जनम मुनि जतन करही, अंत राम कही आवत नही” म्हणजेच जर तुमच्या जीवनात समस्या असेल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकदा शांतपणे देवाची आराधना करा, तर तुमचे जीवन यशस्वी होईल. तुम्हाला योग्य मार्ग कळेल. पण यासोबतच त्या म्हणाल्या की, पालकांनी मुलांना शिकवावे.
advertisement
शिक्षिका नवरीला हेलिकॉप्टरने घ्यायला आला वकील नवरदेव, गव्हाच्या शेतात बनवलं हेलिपॅड, कसा होता तो क्षण?
मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात जाण्यासाठी सहकार्य करायला हवे. त्यांच्यावर जबरदस्तीने ओझे लादू नये. मुलांना त्यांच्या आवडीनुसार बढती द्यावी. चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबले पाहिजे. यातही अध्यात्माला खूप महत्त्व आहे. मुलांना आध्यात्मिक बनवा, असे त्या म्हणाल्या.
जया किशोरींमुळे झाल्या प्रभावित -
अलका किशोरी यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना जया किशोरी यांची कथा ऐकली. तेव्हा त्यांनी सांगितले की, सर्वात आधी जर कुणाला जर काही द्यायचे असेल तर हास्य द्या. तेव्हापासूनच मला कथेत आवड निर्माण झाली. यानंतर मला माझ्या कुटुबीयांचे सहकार्य मिळाले. गुरू पुरुषोत्तम गुरूजी महाराज यांच्यापासून शिकवण मिळाली. तेव्हापासून मी कथावाचन करत आहे. किशोरी हे नावही त्यांना त्यांच्या गुरूंनी दिले आहे, असे त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
जया किशोरींमुळे प्रभावित, शेतकऱ्याची मुलगी झाली कथावाचिका!, कोण आहेत अलका किशोरी?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement