शिक्षिका नवरीला हेलिकॉप्टरने घ्यायला आला वकील नवरदेव, गव्हाच्या शेतात बनवलं हेलिपॅड, कसा होता तो क्षण?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
प्रवीन दहिया असे नवरदेवाचे नाव आहे. ते हेलिकॉप्टरमध्ये वरात घेऊन आले होते. हेलिकॉप्टरमध्ये नवरीला घेऊन जातानाचे हे दृश्य अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले.
सोनाली भाटी, प्रतिनिधी
जालौर : सध्या सर्वत्र लग्नाचा सीजन सुरू झाला आहे. लग्न हे प्रत्येकासाठी विशेष असते. हा असा क्षण असतो, जो प्रत्येकाला आयुष्यभर लक्षात राहावा, अशा पद्धतीने आयोजित करावासा वाटतो. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने लग्नसोहळा आयोजित करतो. आधी वधूला आणण्यासाठी वर घोड्यावर जात होता. मात्र, आताच्या काळात अनेक बदल झाले आहेत. असाच एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला.
advertisement
राजस्थान राज्यातील जालौर येथे हा प्रकार पाहायला मिळाला. याठिकाणी एक वकील नवरदेव आपली शिक्षिका नवरीला आणण्यासाठी हेलिकॉप्टरने पोहोचला. यासाठी शेतात हेलिपॅड बनवण्यात आले होते. हेलिकॉप्टर उतरताच ते पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. लग्नसोहळा संपन्न झाल्यावर वकील नवरदेवाने आपल्या वधूला हेलिकॉप्टरमध्ये नेले. यावेळी संपूर्ण गाव त्यांना पाहण्यासाठी गोळा झाल्याचे पाहायला मिळाले.
advertisement
प्रवीन दहिया असे नवरदेवाचे नाव आहे. ते राजस्थानच्या जालौर येथली शांती नगर कॉलनीतील रहिवासी आहेत. हेलिकॉप्टरमध्ये नवरीला घेऊन जातानाचे हे दृश्य अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले. अनेकांनी वर-वधूचे कौतुक केले. याठिकाणी हेलिकॉप्टरवर आलेली ही वरात आणि या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे.

advertisement
याठिकाणी गावातच भरतं न्यायालय, सरपंच बनतात न्यायाधीश, अशाप्रकारे लोकांना मिळतो न्याय!
view commentsअधिवक्ता प्रवीण कुमार यांच्या सासरच्या लोकांनी गावाजवळील गव्हाच्या शेतात हेलिपॅड तयार केले होते आणि तेथे हेलिकॉप्टर उतरवले. हे हेलिकॉप्टर पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. दरम्यान, याठिकाणी अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथकही उपस्थित आहे. काही लोक कारने येतात, काही मोठ्या वाहनांमध्ये येतात. मात्र, याठिकाणी नवरदेवाने चक्क हेलिकॉप्टरमध्ये वरात आणली आणि आपल्या वधूला हेलिकॉप्टरमध्ये घेऊन गेला. त्यामुळे या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे.
Location :
Rajasthan
First Published :
February 19, 2024 12:04 PM IST
मराठी बातम्या/Viral/
शिक्षिका नवरीला हेलिकॉप्टरने घ्यायला आला वकील नवरदेव, गव्हाच्या शेतात बनवलं हेलिपॅड, कसा होता तो क्षण?


