चैत्र नवरात्रीबद्दल माहितीये का? प्रत्येक मनोकामना होईल पूर्ण, पुराणात सांगितलंय महत्त्व, Video

Last Updated:

हिंदू धर्मात वर्षभरात चार नवरात्री असतात. चैत्र, अश्विन, आषाढ आणि माघ महिन्यात या नवरात्री येतात.

+
चैत्र

चैत्र नवरात्रीबद्दल माहितीये का? प्रत्येक मनोकामना होईल पूर्ण, पुराणांत सांगितलंय महत्त्व, Video

प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई: भारतात नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. नवरात्र उत्सव म्हटलं की सर्वांना शारदीय नवरात्र उत्सव आठवतो. मात्र, हिंदू धर्मात वर्षभरात चार नवरात्री असतात. चैत्र, अश्विन, आषाढ आणि माघ महिन्यात या नवरात्री येतात. चैत्र महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला वसंत नवरात्री असे देखील म्हटलं जातं. हिंदू धर्मामध्ये ही नवरात्री तब्बल 9 दिवस भक्ती भावाने साजरी करतात. मुंबईतील पौराणिक विद्या अभ्यासक सूरज म्हशेळकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
पुराणात चैत्र नवरात्रीचे महत्त्व
पुराणांमध्ये चैत्र नवरात्रीला आत्मशुद्धी आणि मुक्तीचा आधार मानले आहे. तसेच शारदीय नवरात्रीला वैभव आणि भोग प्रदान करणारे मानले जाते. तसेच गुप्त नवरात्रीला तंत्र क्रियांशी जुळलेले लोकं अधिक पुजतात. या दरम्यान तांत्रिक आणि इतर धर्म-कर्म याने जुळलेले लोक साधना करतात. या दरम्यान केलेले टोने-टोटके प्रभावी असतात. चैत्र नवरात्री म्हणजे या नऊ दिवस लोकं उपवास ठेवून आपली भौतिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि तांत्रिक इच्छा पूर्ण करण्याची कामना करतात. या दिवसांमध्ये ईश्वरीय शक्ती उपासकासोबत असते आणि त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्यास मदत करते, असे म्हशेळकर सांगतात.
advertisement
ज्योतिषीय दृष्टीने चैत्र नवरात्री महत्त्व
चैत्र नवरात्रीत सूर्याचं राशी परिवर्तन होतं आणि या दरम्यान सूर्य मेष राशीत प्रवेश करतो. चैत्र नवरात्रीपासून नववर्ष पंचांगाची गणना सुरू होते. सूर्याच्या मेष राशीत प्रवेश इतर सर्व राशींवर प्रभाव टाकतो. नवरात्रीत नऊ दिवस खूप शुभ असल्याचे असे मानले जाते. या दरम्यान कुठलेही शुभ कार्य अगदी विचार न करता आणि मुर्हूत न बघता देखील करता येतात. कारण पूर्ण सृष्टीला आपल्या मायेने पांघरणारी आदिशक्ती या काळात पृथ्वीवर असते, अंस म्हशेळकर यांनी सांगितलं.
advertisement
नवरात्रीत हवन पूजनाचे फायदे
चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तिसर्‍या चैत्र नवरात्रीत प्रभू विष्णूंनी मत्स्य रूपात पृथ्वीची स्थापना केली होती. नंतर प्रभू विष्णू प्रभू राम या रूपात देखील चैत्र नवरात्रीत प्रकट झाले होते. म्हणून या दिवसांचे खूप महत्त्व आहे. चैत्र नवरात्रीत हवन पूजन आणि आरोग्याचे खूप फायदे आहेत. या दरम्यान चारी नवरात्र ऋतूंच्या संधीकाळात असतात. अर्थात या दरम्यान हवामान बदलते. या कारणामुळे व्यक्ती मानसिक रूपाने स्वत:ला कमजोर जाणवतो. मनाला पूर्वीप्रमाणे दुरुस्त करण्यासाठी व्रत केले जाते, असेही सूरज म्हशेळकर सांगतात.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
चैत्र नवरात्रीबद्दल माहितीये का? प्रत्येक मनोकामना होईल पूर्ण, पुराणात सांगितलंय महत्त्व, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement