मासिक शिवरात्रीचा व्रत अन् होतील सर्व संकटे दूर; अशाप्रकारे करा ‘हे’ उपाय Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. याच मासिक शिवरात्रीचे मुंबई येथील पौराणिक विद्या अभ्यासक सुरज सदानंद म्हशेळकर यांनी महत्त्व सांगितलं आहे.
प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष महत्त्व आहे. यात देव महेश यांना सर्व देवांचे देव महादेव म्हणून विशेष पुजले जाते. सनातन हिंदू धर्मात महादेवाच्या पूजेला सर्व दिवस समर्पित आहेत. मात्र, मासिक शिवरात्र आणि वर्षातून एकदा येणारी महाशिवरात्री तिथीला विशेष महत्त्व आहे. दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. याच मासिक शिवरात्रीचे मुंबई येथील पौराणिक विद्या अभ्यासक सुरज सदानंद म्हशेळकर यांनी महत्त्व सांगितलं आहे.
advertisement
मासिक शिवरात्रीचे काय आहे महत्त्व?
मासिक शिवरात्रीचे व्रत केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात. शास्त्रानुसार देवी लक्ष्मी, सरस्वती, इंद्राणी, गायत्री, सावित्री आणि माता पार्वती यांनी शिवरात्रीचे व्रत केले होते आणि शिवाच्या कृपेने त्यांना अनंत फळ मिळाले होते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्णा पक्षात मासिक शिवरात्री येते. वर्षभरात एकूण 12 मासिक शिवरात्री येतात. त्यानुसार 8 एप्रिल 2024 रोजी मासिक शिवरात्री आहे. महादेवाला समर्पित या दिवशी प्रदोष काळात महादेवाच्या विधीवत पुजासह महाशिवरात्री व्रत कथेचे वाचन किंवा श्रवण केल्याने विशेष लाभ होतो, असं सुरज म्हशेळकर सांगतात.
advertisement
Somvati Amavasya : आज सोमवती अमावस्या, घरातील सर्व वाद दूर होणार, पितरांना मिळणार मोक्ष; जाणून घ्या, हा शुभ मुहूर्त
मासिक शिवरात्री व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. त्याला सुख समृध्दी प्राप्त होते. तसेच शिवालयात किंवा घराच्या पूर्व भागात बसून शिव मंत्रांचा जप केल्यास अधिक फळ मिळते. मासिक शिवरात्रीच्या पूजेनंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि स्वतः भोजन करावे. जो भक्त मासिक शिवरात्रीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळतो त्याच्या मातापित्यांची सर्व पापे नष्ट होतात. त्याच वेळी, स्वतःचे सर्व त्रास दूर होतात आणि त्या व्यक्तीला जीवनातील सर्व सुख प्राप्त होते. या व्रताच्या महिमाने व्यक्तीला दीर्घायुष्य, धन, आरोग्य, संतान इत्यादी प्राप्त होतात, असे मानले जाते की हे व्रत पाळणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असंही सुरज म्हशेळकर सांगतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 08, 2024 8:40 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
मासिक शिवरात्रीचा व्रत अन् होतील सर्व संकटे दूर; अशाप्रकारे करा ‘हे’ उपाय Video