2015 नंतर पहिल्यांदाच असं घडतंय! तब्बल 11 वर्षानंतर संक्रातीला मोठा योगायोग, काय आहे खास?

Last Updated:

ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्माच्या दृष्टीने 2026 हे वर्ष अत्यंत विशेष ठरणार आहे. यावर्षी 14 जानेवारी 2026, बुधवार रोजी नवीन वर्षातील पहिला सण 'मकर संक्रांत' आणि भगवान विष्णूंना समर्पित 'एकादशी' एकाच दिवशी येत आहेत.

News18
News18
Makar Sankranti 2026 : ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्माच्या दृष्टीने 2026 हे वर्ष अत्यंत विशेष ठरणार आहे. यावर्षी 14 जानेवारी 2026, बुधवार रोजी नवीन वर्षातील पहिला सण 'मकर संक्रांत' आणि भगवान विष्णूंना समर्पित 'षटतिला एकादशी' एकाच दिवशी येत आहेत. असा दुर्मिळ योगायोग यापूर्वी 2015 मध्ये जुळून आला होता. सूर्यदेवाची उपासना आणि श्रीहरी विष्णूंची भक्ती यांचा हा संगम साधकांसाठी अक्षय पुण्य मिळवून देणारा ठरणार आहे.
षटतिला एकादशी आणि संक्रांतीचा संगम का आहे खास?
षटतिला एकादशीला 'तिळाचे' अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रानुसार या दिवशी तिळाचा सहा प्रकारे वापर केल्यास सर्व पापांतून मुक्ती मिळते. योगायोगाने, मकर संक्रांतीलाही तिळाचेच महत्त्व असते. त्यामुळे या दिवशी केलेली उपासना दुप्पट फळ देणारी ठरेल.
या दिवशी 'काय करावे'?
1. पवित्र स्नान: सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे. यामुळे शनी आणि राहूचे दोष कमी होतात.
advertisement
2. सूर्य पूजा: तांब्याच्या कलशात पाणी, लाल फुले, अक्षता आणि तीळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. 'ॐ घृणि सूर्याय नमः' या मंत्राचा जप करावा.
3. विष्णू पूजन: भगवान विष्णूंना पिवळी फुले, तुळस आणि तिळाचा नैवेद्य अर्पण करावा. विष्णू सहस्त्रनाम किंवा विठ्ठल नामाचा जप करणे अत्यंत फलदायी ठरेल.
4. तिळाचे दान: संक्रांतीच्या दिवशी तीळ, गूळ, नवीन धान्य आणि ऊबदार कपड्यांचे दान करावे. एकादशी असल्याने अन्नाऐवजी कोरडा शिधा देणे अधिक श्रेयस्कर आहे.
advertisement
5. उपवास नियम: या दिवशी एकादशी असल्याने शक्य असल्यास उपवास धरावा. संक्रांतीच्या दिवशी गोड खाण्याची पद्धत असली, तरी एकादशीचा सन्मान राखत सात्त्विक फराळ करावा.
या दिवशी 'काय करू नये'?
1. तांदळाची खिचडी टाळा: संक्रांतीला खिचडी खाण्याची आणि दान करण्याची जुनी परंपरा आहे. मात्र, एकादशीला तांदूळ खाणे आणि दान करणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे यंदा खिचडी ऐवजी केवळ तीळ-गूळ किंवा फळांचे दान करावे.
advertisement
2. तामसिक भोजन: या दिवशी कांदा, लसूण, मांस आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे.
3. वादविवाद: संक्रांत आणि एकादशी हे दोन्ही संयमाचे सण आहेत. या दिवशी कोणाशीही भांडण करू नये किंवा कटू शब्द बोलू नयेत.
4. झाडे तोडणे: या पवित्र दिवशी वृक्षतोड करणे किंवा निसर्गाला हानी पोहोचवणे अशुभ मानले जाते.
5. उशिरा उठणे: या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे अनिवार्य आहे. उशिरा उठल्याने भाग्यात अडथळे निर्माण होतात असे मानले जाते.
advertisement
दानाचे महत्त्व आणि बदललेला नियम
यंदा एकादशी असल्याने खिचडी दान करण्याऐवजी तीळ, गूळ, बाजरी, फळे किंवा कपडे दान करा. जर तुम्हाला खिचडीच दान करायची असेल, तर ती एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी दान करणे अधिक शास्त्रोक्त ठरेल.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
2015 नंतर पहिल्यांदाच असं घडतंय! तब्बल 11 वर्षानंतर संक्रातीला मोठा योगायोग, काय आहे खास?
Next Article
advertisement
BJP vs Shiv Sena Ambernath : भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, अंबरनाथ नगर परिषदेत मोठी उलथापालथ, सगळा गेमच फिरला!
भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, गेमच फिरला अंबरनाथमध्ये उलथापाल
  • अंबरनाथ नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

  • शिवसेना शिंदे गटाची अंबरनाथमधून सत्ता उलथवण्यासाठी भाजपने जंग पछाडलं.

  • शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे भाजप पुरता घायाळ

View All
advertisement