advertisement

Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्येला पितृदोष शांतीसाठी 4 विशेष उपाय! जीवनात प्रगतीच्या वाटा सापडतात

Last Updated:

Mauni Amavasya 2025: पितृदोष शांतीसाठी उपाय देखील केले जातात. पिंडदान, पूर्वजांना जल अर्पण इत्यादी गोष्टी अमावस्येला केल्या जातात. घरात पितृदोषाचा त्रास होत असेल तर अमावस्येला काही उपाय करून आपण या दोषापासून मुक्त होऊ शकतो.

News18
News18
मुंबई : पौष महिन्याच्या अमावस्येला दर्श मौनी अमावस्या म्हणतात. मकर संक्रांतीनंतरची ही पहिली अमावस्या असल्यानं तिला मौनी अमावस्या म्हणतात. हिंदू धर्मात मौनी अमावस्येचे विशेष महत्त्व आहे. पितृदोषाच्या शांतीसाठी मौनी अमावस्येचा दिवस खूप महत्वाचा आहे. या वर्षी मौनी अमावस्या 29 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. अमावस्येला विष्णूची पूजा विधीनुसार केली जाते. लोक पिंपळाच्या झाडाची पूजा देखील करतात. भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते, सर्व पापांपासून मुक्तता मिळते, पूर्वजांना मोक्ष मिळतो, असे मानले जाते.
पितृदोष शांतीसाठी उपाय देखील केले जातात. पिंडदान, पूर्वजांना जल अर्पण इत्यादी गोष्टी अमावस्येला केल्या जातात. घरात पितृदोषाचा त्रास होत असेल तर अमावस्येला काही उपाय करून आपण या दोषापासून मुक्त होऊ शकतो. पूर्वजांची कृपा राहील, त्यांना मोक्ष मिळण्यास मदत होते.
मौनी अमावस्येला पितृदोष मुक्ती उपाय -
वास्तु विशेषज्ञ, जीवन आणि करिअर सल्लागार डॉ. योगेश शर्मा यांच्या मते, पितृदोष शांतीसाठी दर्श मौनी अमावस्येचे विशेष महत्त्व आहे. आयुष्यातील रखडलेले काम पुढे जाईल. आयुष्यात नशीबाची साथ मिळते. यासाठी मौनी अमावस्येला गरजूंना अन्नदान करावे. हे दान तुमच्या वजनाइतके किंवा तुमच्या वजनाच्या दहावा भाग असावे.
advertisement
मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही गरीब आणि गरजूंना कपडे दान करू शकता. वापरलेले कपडे, अस्वच्छ कपडे दान करू नयेत.
थंडीचा काळ सुरू असल्यानं गरजूंना ब्लँकेट दान करू शकता. असं करणं तुमच्यासाठी शुभ आणि फळदायी देखील ठरू शकते.
advertisement
मौनी अमावस्येच्या दिवशी एक विशेष उपाय करावा. हा उपाय म्हणजे मौन व्रत पाळणे. तुम्ही संपूर्ण दिवस मौन धारण करू शकता. जर हे शक्य नसेल तर तुम्ही अर्धा तास, एक तास किंवा दोन तासही मौन पाळू शकता. मौनी अमावस्या हा मौन उपवास करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी आपण काही वेळ मौन धारण करून शांत राहिले पाहिजे. एक किंवा दोन तास मौन पाळून परमेश्वराचे स्मरण करावे. विष्णु सहस्रनामाचे पठण ऐकू शकता किंवा शांतपणे जप करू शकता. यामुळे पूर्वजांना शांती मिळते. आपल्या आयुष्यातही प्रगतीचे मार्ग खुले होतात. प्रलंबित कामे पूर्ण होतील.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्येला पितृदोष शांतीसाठी 4 विशेष उपाय! जीवनात प्रगतीच्या वाटा सापडतात
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement