अंगारकी संकष्टी चतुर्थी: चंद्रदर्शनानं सोडावा उपवास, तुमच्या शहरात किती वाजता दिसेल चंद्र?

Last Updated:

असं म्हणतात की, अंगारकी संकष्टी चतुर्थीला केलेल्या व्रतामुळे मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, शिवाय अडकलेली सर्व कामं मार्गी लागतात.

+
या

या एका व्रतामुळे 21 संकष्टी व्रतांचं फळ मिळतं, अशी मान्यता आहे.

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण बाप्पाला साकडं घालून करतो. सर्व देवतांच्या आधी त्याला पूजतो. म्हणूनच गणरायाला आराध्य दैवत मानलं जातं. वर्षभरात गणपती बाप्पासाठी काही व्रत आवर्जून पाळले जातात. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला बाप्पाची विशेष पूजा केली जाते. ज्येष्ठ महिन्यात येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी हे व्रतही महत्त्वाचं असतं. अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष पुण्यप्रद म्हणतात. या दिवसाचा उपवास हा चंद्रदर्शन करूनच सोडला जातो. त्यामुळे जाणून घेऊया, या दिवशी तुमच्या शहरात किती वाजता होणार चंद्रोदय.
advertisement
असं म्हणतात की, अंगारकी संकष्टी चतुर्थीला केलेल्या व्रतामुळे मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, शिवाय अडकलेली सर्व कामं मार्गी लागतात. ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचा उपवास पाळायला जमत नसेल त्यांनी अंगारकीचा उपवास न चूकता, न विसरता करावा असं म्हणतात. या एका व्रतामुळे 21 संकष्टी व्रतांचं फळ मिळतं, अशी मान्यता आहे.
advertisement
मंगळवार, 25 जून 2024 रोजी मध्यरात्री 1 वाजून 23 मिनिटांनी अंगारकी संकष्टी चतुर्थीला प्रारंभ झाला. 25 जून रोजी रात्री 11 वाजून 11 मिनिटांनी ही चतुर्थी तिथी समाप्त होईल. सकाळी स्नानादी कार्य आटोपल्यावर व्रताचा संकल्प करावा. देवपूजा करावी, गणरायाला जलाभिषेक करावा, फुलं, फळं अर्पण करून पिवळं चंदन लावावं. नैवेद्यात तिळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करावे. संकष्टी चतुर्थीची कथा वाचावी. ॐ गं गणपतये नमः या मंत्राचा जप करावा आणि अत्यंत भक्तीभावानं बाप्पाची आरती करावी. क्षमा प्रार्थना करावी, असा या दिवसाचा पूजा विधी असतो. ज्योतिषी राजेश जोशी यांनी याबाबत माहिती दिली.
advertisement
शहराप्रमाणे चंद्रोदयाची वेळ:
  • मुंबई - 10 वाजून 28 मिनिटे.
  • ठाणे - 10 वाजून 28 मिनिटे.
  • पुणे - 10 वाजून 23 मिनिटे.
  • रत्नागिरी - 10 वाजून 23 मिनिटे.
  • कोल्हापूर - 10 वाजून 19 मिनिटे.
  • सातारा - 10 वाजून 22 मिनिटे.
  • नाशिक - 10 वाजून 26 मिनिटे.
  • अहमदनगर - 10 वाजून 20 मिनिटे.
  • पणजी - 10 वाजून 19 मिनिटे.
  • धुळे - 10 वाजून 23 मिनिटे.
  • जळगाव - 10 वाजून 20 मिनिटे.
  • वर्धा - 10 वाजून 7 मिनिटे.
  • यवतमाळ - 10 वाजून 8 मिनिटे.
  • बीड - 10 वाजून 16 मिनिटे.
  • सांगली - 10 वाजून 18 मिनिटे.
  • सावंतवाडी - 10 वाजून 20 मिनिटे.
  • सोलापूर - 10 वाजून 14 मिनिटे.
  • नागपूर - 10 वाजून 5 मिनिटे.
  • अमरावती - 10 वाजून 11 मिनिटे.
  • अकोला - 10 वाजून 14 मिनिटे.
  • छत्रपती संभाजीनगर - 10 वाजून 19 मिनिटे.
  • भुसावळ - 10 वाजून 19 मिनिटे.
  • परभणी - 10 वाजून 12 मिनिटे.
  • नांदेड - 10 वाजून 9 मिनिटे.
advertisement
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
अंगारकी संकष्टी चतुर्थी: चंद्रदर्शनानं सोडावा उपवास, तुमच्या शहरात किती वाजता दिसेल चंद्र?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement