Nag Panchami 2023: येत्या नागपंचमीला करा हे 5 सोपे उपाय, कालसर्प दोषातून मिळेल मुक्ती
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Nag Panchami 2023: नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केली जाते जेणेकरून सापांची भीती राहू नये, त्यांच्यापासून आपले आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी नागपंचमी कधी आहे, नागपंचमी पूजेचा शुभ काळ कोणता? कालसर्प दोषांवरील उपाय याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊ.
मुंबई, 04 ऑगस्ट : दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक नागाची पूजा करतात. वासुकी नाग हा भगवान शिवाच्या गळ्यातील माळ आहे, तर भगवान विष्णू शेषनागाच्या पलंगावर झोपलेले असतात. धार्मिक मान्यतेनुसार, पृथ्वीचे वजन शेषनागाने पेलले आहे, तर वासुकी ही समुद्रमंथनाच्या वेळी मजबूत दोरी होती, त्यामुळे समुद्रमंथन झाले, त्यातून अमृतासह अनेक मौल्यवान वस्तू बाहेर पडल्या आणि श्रीहीन देवांना पुन्हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाला. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केली जाते जेणेकरून सापांची भीती राहू नये, त्यांच्यापासून आपले आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी नागपंचमी कधी आहे, नागपंचमी पूजेचा शुभ काळ कोणता? कालसर्प दोषांवरील उपाय याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊ.
नाग पंचमी 2023 तारीख -
हिंदू कॅलेंडरनुसार, नागपंचमीसाठी श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी सोमवार, 21 ऑगस्ट रोजी सकाळी 12:21 वाजता सुरू होईल आणि ही तिथी मंगळवार, 22 ऑगस्ट रोजी पहाटे 02:00 वाजता समाप्त होईल. सूर्योदयाच्या तिथीनुसार यंदा नागपंचमी सोमवारी, 21 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.
advertisement
नाग पंचमी 2023 पूजेचा शुभ मुहूर्त -
21 ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 2 तास 36 मिनिटे आहे. त्या दिवशी पहाटे 05:53 पासून नागपंचमीची पूजा करू शकता. नागपंचमी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आहे.
नागपंचमी 2023 कालसर्प दोषासाठी उपाय -
1. तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल आणि तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर या वर्षी नागपंचमीला नागाची पूजा करा. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळामध्ये नाग पंचमीला मोठा उत्सव असतो. तेथे किंवा नाग मंदिरांमध्ये पूजा करून दर्शन घेतल्याने कालसर्प दोष नाहीसा होतो आणि सापांचे भय नाहीसे होते, असे मानले जाते.
advertisement
2. कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण महिना चांगला मानला जातो. कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी योग्य ज्योतिषाकडून राहुकालातील भगवान शिवाची पूजा करा. भगवान शंकराच्या कृपेने कालसर्प दोष दूर होईल.
3. कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्या किंवा नागपंचमीला चांदीच्या नाग आणि नागाच्या जोडीची पूजा करा. त्यानंतर कालसर्प दोषापासून मुक्तीसाठी प्रार्थना करावी आणि मूर्ती नदीच्या पाण्यात वाहू द्यावे. कालसर्प दोषाची भीती नाहीशी होईल.
advertisement
4. कालसर्प दोष असलेल्या लोकांनी भगवान भोलेनाथाची पूजा करावी आणि शिव तांडव स्तोत्राचे पठण करावे. महाकालाच्या आशीर्वादाने तुम्हाला लाभेल.
5. भगवान श्रीकृष्णाची उपासना केल्याने कालसर्प दोषापासूनही मुक्ती मिळते. पण लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्णाची अशी मूर्ती किंवा चित्र असावे, ज्यामध्ये त्यांनी मोराचा मुकुट धारण केला आहे.
advertisement
नागपंचमीचे महत्त्व -
नागपंचमीला सापांपासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण व्हावे, यासाठी नागांची पूजा केली जाते. याशिवाय कुंडलीत कालसर्प दोष असेल तर नागपंचमीला पूजा केल्याने लाभ होतो. महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे नागपंचमी निमित्त मोठी यात्रा भरते. जिवंत नागांची पूजा करण्याची येथे मोठी परंपरा आहे. तसेच उज्जैनचे नागचंद्रेश्वर मंदिर वर्षातून एकदाच नागपंचमीला उघडते. या दिवशी पूजा केल्याने कालसर्प दोष शांत होतो. नागपंचमीच्या दिवशी या मंदिरात मोठी गर्दी असते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
First Published :
August 04, 2023 11:57 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Nag Panchami 2023: येत्या नागपंचमीला करा हे 5 सोपे उपाय, कालसर्प दोषातून मिळेल मुक्ती


