Makar Sankranti 2025: दर मकर संक्रांतीनंतर तिळीएवढी वाढते बाप्पाची मूर्ती? मंदिर आपल्या महाराष्ट्रातच!

Last Updated:

Makar Sankranti 2025: बाप्पाच्या या मंदिरावरूनच इथल्या संपूर्ण वस्तीला 'गणेशवाली' असं नाव देण्यात आलं आहे. तिळा गणपती मंदिराचे पुजारी उत्तम भडके यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.  

+
तीळ

तीळ चतुर्थीला असते गणपतीची मोठी यात्रा

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी, नाशिक : आपलं महाराष्ट्र विविध देवस्थानांनी संपन्न आहे. नाशिक जिल्ह्यातही अनेक प्राचीन मंदिरं आहेत. हे शहर प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन झालं अशी मान्यता आहे. तसंच दक्षिण गंगा अर्थात गोदावरीचं पात्र वाहणाऱ्या पाण्याच्या काठी गोदाघाटदेखील पर्यटनाचं आणि धार्मिकतेचं स्थान बनलंय. नाशिकमधील प्रसिद्ध मंदिरांमध्ये पंचवटी परिसरात असलेल्या गणेशवाडीतील तिळा गणपती मंदिराचं नाव आवर्जून घेतलं जातं.
बाप्पाच्या या मंदिरावरूनच इथल्या संपूर्ण वस्तीला 'गणेशवाली' असं नाव देण्यात आलं आहे. तिळा गणपती मंदिराचे पुजारी उत्तम भडके यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
नाशकात वास्तव्यास आलेल्या दामोदर दगडूशेठ सोनार यांना सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी आपल्या घराच्या बांधकामात पाया खोदताना डाव्या सोडेची स्वयंभू गणेश मूर्ती सापडली होती. मग त्यांच्या अगदी घरासमोरच या मूर्तीची स्थापना करण्यात आली. बाप्पासाठी एक मोठं भव्य मंदिर बांधण्यात आलं. गेल्या 8 पिढ्यांनी या गणरायाची नित्यनेमानं सेवा केली, जी अविरत सुरू आहे.
advertisement
बाप्पाची ही डाव्या सोंडेची मूर्ती स्वयंभू मानली जाते. काळ्या पाषाणाची ही मूर्ती अतिशय सुंदर दिसते. विशेष म्हणजे दर संक्रांतीनंतर येणाऱ्या तीळ चतुर्थीला हा गणपती तिळीएवढा वाढत असल्याची मान्यता आहे. त्यामुळे बाप्पाचं हे रूप पाहण्यासाठी दर तीळ चतुर्थीला भाविक मोठ्या संख्येनं दर्शन घेण्यासाठी इथं दाखल होतात. तसंच तीळीप्रमाणे वाढत असल्यामुळे या बाप्पाला 'तिळा गणपती' म्हणून ओळखलं जातं.
advertisement

नेमकं कुठे आहे तिळा गणपतीचं मंदिर?

नाशिकच्या पंचवटी परिसरातील काहीच अंतरावर असलेल्या गणेशवाडीत एका टेकडीवर तिळा गणपतीचं प्राचीन देऊळ आहे.
मराठी बातम्या/अध्यात्म/
Makar Sankranti 2025: दर मकर संक्रांतीनंतर तिळीएवढी वाढते बाप्पाची मूर्ती? मंदिर आपल्या महाराष्ट्रातच!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement