rakshabandhan 2023: रक्षाबंधनला बांधलेली राखी किती दिवस ठेवावी? कधी काढावी, राखी काढण्याची वेळ कोणती?

Last Updated:

rakshabandhan 2023: काही लोक रक्षाबंधन दिवशी बांधलेली राखी वर्षभर ठेवतात, तर काहीजण रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी ती उतरवतात. राखी किती दिवस घालता येईल? राखी कधी काढावी किंवा राखी काढण्याची वेळ कोणती? असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल.

राखी कधी सोडवावी?
राखी कधी सोडवावी?
मुंबई, 25 ऑगस्ट : रक्षाबंधनाच्या सणाला बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. काही लोक रक्षाबंधन दिवशी बांधलेली राखी वर्षभर ठेवतात, तर काहीजण रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी ती उतरवतात. राखी किती दिवस घालता येईल? राखी कधी काढावी किंवा राखी काढण्याची वेळ कोणती? असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल. राखी कधी उतरवायची आणि कुठे विसर्जित करायची याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
राखी कधी काढावी?
काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट सांगतात की, शास्त्रात राखी काढण्यासाठी कोणताही निश्चित दिवस किंवा वेळ निश्चित केलेली नाही. रक्षाबंधनानंतर 24 तासांनी राखी काढावी. वर्षभर राखी बांधलेली तशीच ठेवली जात नाही. वर्षभर राखी बांधली तर कदाचित दोष लागू शकतो, ती अपवित्र होते. रक्षाबंधननंतर काही दिवसांनी पितृपक्ष सुरू होतो, त्यात राखी घातलेली असेल तर ती अपवित्र होते. अशुद्ध वस्तू टाकून दिल्या जातात, त्या परिधान केल्या जात नाहीत. अशुद्धतेमुळे नकारात्मकता निर्माण होते.
advertisement
राखीचे विसर्जन कधी आणि कुठे करायचे?
रक्षाबंधनाच्या 24 तासांनंतर आपल्या हातातून स्वत: राखी काढावी. त्यानंतर विसर्जन करावे. इथे विसर्जन म्हणजे तुम्ही ती राखी एखाद्या झाडाला बांधू शकता.
सोन्या-चांदीची राखी किती दिवस घालायची?
ज्योतिषी भट्ट म्हणतात, की रक्षाबंधन हा रक्षा सूत्राशी संबंधित आहे. रक्षासूत्र कापसाच्या धाग्याने बनवले जाते. जे सोने किंवा चांदीची राखी घालतात ते वर्षभर ती घालू शकतात. कारण ती धातूची बनलेली असते आणि ती फॅशनशी संबंधित आहे. सोन्या-चांदीची राखी माणसाची समृद्धी दर्शवते, तर रक्षाबंधनाचा संबंध बहिणीच्या रक्षणाच्या भावनेशी आहे. माणूस आपल्या कुवतीनुसार सण साजरा करतो.
advertisement
चुकूनही अशी राखी बांधू नका -
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी आपल्या भावाला काळ्या धाग्याची राखी किंवा काळ्या रंगाची राखी बांधू नये. काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. धार्मिक कार्याच्या दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
rakshabandhan 2023: रक्षाबंधनला बांधलेली राखी किती दिवस ठेवावी? कधी काढावी, राखी काढण्याची वेळ कोणती?
Next Article
advertisement
ZP Election Municipal elections : निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन
निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, ZP, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन!
  • निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, ZP, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन!

  • निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, ZP, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन!

  • निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, ZP, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन!

View All
advertisement