advertisement

Vastu Tips: झाडू मारण्याची सर्वात योग्य पद्धत! कचऱ्यासोबत घरातील दुर्गुणही बाहेर पडतात, लक्ष्मी निवास

Last Updated:

Vastu Tips Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार झाडू मारताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, अन्यथा घराची लक्ष्मी निघून जाते. घरात झाडू मारताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबद्दल कृष्णगिरी पीठाधीश्वर वसंत विजय महाराजांकडून जाणून घेऊया.

News18
News18
मुंबई : सर्वसाधारणपणे प्रत्येक घरात सकाळी झाडूने घराची स्वच्छता केली जाते. झाडून-पुसून घेतलं जातं, घराच्या जिवंतपणाचे ते लक्षण मानले जाते. झाडुला धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मी वास करते, ज्या घरात स्वच्छता नसते तिथे गरिबी राहते, असे मानले जाते. काही लोक सकाळी आणि संध्याकाळी घर झाडतात तर काही लोक कोणत्याही वेळी झाडू मारतात. ज्योतिषशास्त्रानुसार झाडू मारताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, अन्यथा घराची लक्ष्मी निघून जाते. घरात झाडू मारताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबद्दल कृष्णगिरी पीठाधीश्वर वसंत विजय महाराजांकडून जाणून घेऊया.
झाडू मारताना लोक ही चूक करतात -
वसंत विजय महाराज सांगतात, घर साफ करताना आपण काही चुका करतो, ज्यामुळे घरात पैशाची चणचण भासते आणि त्रास कायम राहतात. अनेकजण एकच चूक करतात, ती म्हणजे घराच्या आतून दाराकडे झाडू लावता, म्हणजेच तुम्ही घराच्या आतून झाडू लावायला सुरुवात करता आणि सर्व दाराकडे घेऊन जाता. दाराजवळच सगळा कचरा आपण गोळा करता. झाडू मारताना अनेकजण ही चूक करतात.
advertisement
घराची लक्ष्मी निघून जाईल -
त्यांच्या मते, आपण घर आतून बाहेरच्या दिशेने झाडून काढता तेव्हा तुमच्या घराची देवी लक्ष्मी देखील त्यासोबत बाहेर जाते. शास्त्रांमध्ये ही खूप मोठी बाब आहे. लक्ष्मी घरात राहण्यासाठी झाडू मारताना नेमकं काय करावं याविषयी जाणून घेऊ.
advertisement
घर झाडण्याची योग्य पद्धत -
याविषयी वसंत विजय महाराजांनी लोकांना घर झाडण्याची योग्य पद्धत सांगितली. आपण घराच्या दरवाजापासून झाडू मारायला सुरुवात करावी. हॉल, खोल्या, स्वयंपाकघर इत्यादी झाडून स्वच्छ करा. मग आतील खोलीतील कचरा गोळा करा आणि कचराकुंडीत टाकून द्या.
दरवाजापासून स्वच्छता करायला सुरूवात कराल तेव्हा झाडू देवी लक्ष्मीला आपल्यासोबत घरात ओढून घेऊन येईल. अशा प्रकारे झाडू मारल्यानं त्या घरात देवी लक्ष्मीचा वास होईल आणि कधीही पैशाची अडचण भासणार नाही. ते घर आनंद, समृद्धी, संपत्ती इत्यादींनी भरलेले असेल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: झाडू मारण्याची सर्वात योग्य पद्धत! कचऱ्यासोबत घरातील दुर्गुणही बाहेर पडतात, लक्ष्मी निवास
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement