संकष्टीला चंद्रदर्शनानंतर उपवास का सोडतात? ‘हे’ आहे कारण
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
संकष्टीला उपवास सोडण्यापूर्वी चंद्रदर्शन करावं अशीही पद्धत आहे. चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन का करतात? हे माहिती आहे का?
छत्रपती संभाजीनगर, 3 ऑगस्ट : दर महिन्यात येणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात. या दिवशी बाप्पाची पूजाअर्चा करुन उपवास सोडला जातो. त्याचबरोबर उपवास सोडण्यापूर्वी चंद्रदर्शन करावं अशीही पद्धत आहे. चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन का करतात? त्याचबरोबर कोणत्या चतुर्थीला चंद्रदर्शन करणे टाळावं? याबाबत अनेकांना माहिती नसते. छत्रपती संभाजीनगरमधले गुरुजी अनंत पांडव यांनी याबाबतचं कारण सांगितलं आहे.
काय आहे कारण?
'शास्त्रात दिलेल्या माहितीनुसार, एकदा गणपती बाप्पाचा चंद्रानं अपमान केला. त्यावेळी बाप्पांना खूप राग आला. या रागाच्या भरात त्यांनी चंद्राला 'आजपासून तुझं तोंड कुणीही बघणार नाही. जो बघेल त्याच्यावर चोरी करण्याचा किंवा खोटेपणाचा आरोप येईल,' असा शाप दिला.
advertisement
गणपती बाप्पानं दिलेल्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्रानं गणपतीची कठोर तश्यचर्या केली. त्यावेळी गणपती बाप्पानं चंद्राला उ:शाप दिला. भाद्रपद चतुर्थी म्हणजे ज्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन होतं त्या दिवशी. जर कोणी चंद्र दर्शन करेल तर त्याच्यावरती चोरीचा आळ हा येईल.
advertisement
हा आळ निघून जाण्यासाठी कुणी संकष्टी चतुर्थीला माझा उपवास करेल आणि नंतर चंद्रदर्शन घेईल त्याच्यावरील आळ निघून जाईल, असंही गणपती बाप्पानं सांगितलं. त्यानंतरच संकष्टी चतुर्थीला दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री चंद्रदर्शन करून तो सोडला जातो,' अशी माहिती पांडव यांनी दिली.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 03, 2023 1:18 PM IST

