Surya grahan 2024: सर्वपित्री अमावास्येला कंकणाकृती सूर्यग्रहण! भारतातून काय दिसणार, पहा अचूक कालावधी

Last Updated:

Surya grahan 2024: शेवटचं सूर्यग्रहण सर्वपित्री अमावास्येदिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबरला लागणार आहे. हे पूर्ण ग्रहण नसेल तर कंकणाकृती असेल. त्यालाच ‘रिंग ऑफ फायर’ असंही म्हटलं जातं.

News18
News18
मुंबई : सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण लागतं. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा अमावास्या असते. अमावास्येला लागणारं सूर्यग्रहण हे ज्या भूभागावर चंद्राची सावली पडते तिथून पहायला मिळतं. यंदा सर्वपित्री अमावास्येदिवशी म्हणजेच दोन ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्यग्रहण पहायला मिळणार आहे. ग्रहण ही एक अभूतपूर्व खगोलीय घटना आहे. कंकणाकृती सूर्यग्रहणालाच ‘रिंग ऑफ फायर’ असंही म्हटलं जातं.
या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण सर्वपित्री अमावास्येदिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबरला लागणार आहे. हे पूर्ण ग्रहण नसेल तर कंकणाकृती असेल. त्यालाच ‘रिंग ऑफ फायर’ असंही म्हटलं जातं. या काळात आकाशात एक आगीचं गोलाकार वलय दिसतं. सूर्यग्रहण म्हटलं की ते जगाच्या कोणत्या भागातून दिसणार याबद्दल सगळ्यांनाच कुतूहल असतं.
advertisement
भारतीय प्रमाण वेळेनुसार दोन ऑक्टोबरला रात्री नऊ वाजून 13 मिनिटांनी ग्रहण सुरु होणार आहे. दुसऱ्या दिवशी तीन वाजून 17 मिनिटांनी ते संपणार अहे. मात्र, ग्रहण लागेल तेव्हा आपल्याकडे रात्र असल्यामुळे भारतातून ग्रहण दिसणार नाही. 
advertisement
पृथ्वीप्रमाणेच चंद्रही सूर्याभोवती फिरत असतो. अनेकदा सूर्याभोवती फिरताफिरता चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो. त्यामुळे काही वेळ पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश चंद्रामुळे अडवला जातो. त्यालाच सूर्यग्रहण असं म्हणतात. त्या काळात पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. कंकणाकृती सूर्यग्रहणावेळी चंद्र पृथ्वीपासून लांब असतो. तो सूर्याला पूर्ण झाकत नाही. त्यामुळेच आकाशात आगीचं वलय दिसतं. त्यालाच रिंग ऑफ फायर असं म्हटलं जातं. अमेरिकन स्थानिक वेळेनुसार दुपारी 11 वाजून 42 मिनिटांनी ग्रहण सुरु होणार आहे. दोन वाजून 45 मिनिटांपर्यंत ते चालणार आहे. त्यामुळे अर्जेंटिना, पॅसिफिक महासागर, आर्टिक, दक्षिण अमेरिका, पेरू, फिजी अशा ठिकाणी राहाणाऱ्या नागरिकांना हे ग्रहण बघता येईल.
advertisement
भारतात ग्रहण काळात काही गोष्टी आवर्जून पाळल्या जातात. आंघोळ, पूजापाठ, ध्यानधारणा, मन्वंतर अशा अनेक गोष्टी भारतीय लोक ग्रहण काळात करतात. सहसा ग्रहण बघत नाहीत. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे ग्रहणाचे नियमही भारतीयांना लागू होणार नाहीत, असं सांगण्यात आलं आहे. शिवाय, ग्रहण ही निसर्गातील एक दुर्मिळ घटना असल्यामुळे ती पाहणं अशुभ नाही. डोळ्यांचं योग्य संरक्षण करुन ग्रहण बघावं असं खगोलतज्ज्ञ सांगतात. 
advertisement
(सूचना : येथे दिलेली धार्मिक माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Surya grahan 2024: सर्वपित्री अमावास्येला कंकणाकृती सूर्यग्रहण! भारतातून काय दिसणार, पहा अचूक कालावधी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement