Vastu Tips: एका क्लिकवर संपूर्ण वास्तुशास्त्र! घरात कुठं काय असावं, कोणत्या दिशेला काय असू नये
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: घर बांधण्या/घेण्यापूर्वी आणि नंतर सुद्धा ही माहिती आपणास खूप कामी येऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये कुठे काय असावे, कोणत्या दिशेला काय असावं? याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया.
मुंबई : घरात वास्तुशास्त्राचे नियम पाळण्याचे महत्त्व अनेकांना पटते. वास्तुशास्त्रात अनेक गोष्टींचा तपशीलवार उल्लेख आहे. घर बांधण्या/घेण्यापूर्वी आणि नंतर सुद्धा ही माहिती आपणास खूप कामी येऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये कुठे काय असावे, कोणत्या दिशेला काय असावं? याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया.
उत्तर किंवा पूर्व दिशेला घराचे मुख्य प्रवेशद्वार असणे शुभ मानले जाते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावावे.
घराच्या खिडक्या उत्तर-पूर्व दिशेला असाव्यात. आग्नेय दिशा (दक्षिण-पूर्व) स्वयंपाकघरासाठी सर्वोत्तम मानली जाते. स्वयंपाकघरातील ओटा पूर्व दिशेला असावा. ईशान्य कोपरा (उत्तर-पूर्व) पूजाघरासाठी शुभ मानला जातो. पूजाघरात शांत आणि प्रसन्न वातावरण ठेवावे. नैऋत्य दिशा (दक्षिण-पश्चिम) शयनकक्षासाठी (बेडरुम) योग्य मानली जाते. झोपताना डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवावे. बैठक खोली (हॉल) घराच्या मध्यभागी किंवा उत्तर-पूर्व दिशेला असावी.
advertisement
घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला बाथरूम असावे. घराच्या अंगणात किंवा ईशान्य कोपऱ्यात तुळशीचे रोप लावावे. उत्तर किंवा पूर्व दिशेला पाण्याचे नळ असणे उत्तम मानले जाते. आरसे उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावेत. घरातील रंगांचा सकारात्मक प्रभाव असावा. हल्के रंग वापरावेत, जसे की पांढरा, पिवळा, किंवा हिरवा.
advertisement
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी -
घरातील कोपरे स्वच्छ ठेवावेत.
घरात नियमितपणे धूप किंवा उदबत्ती लावावी.
घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे संगीत लावावे.
घरातील अनावश्यक वस्तू काढून टाकाव्यात.
वास्तुशास्त्रानुसार घराची रचना केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. वास्तुशास्त्र हे एक मार्गदर्शक शास्त्र आहे, त्यामुळे आपल्या गरजेनुसार आणि सोयीनुसार बदल करणे शक्य आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी वास्तुशास्त्र तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 28, 2025 10:35 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: एका क्लिकवर संपूर्ण वास्तुशास्त्र! घरात कुठं काय असावं, कोणत्या दिशेला काय असू नये







