Shardiya navratri 2024: शारदीय नवरात्रीला लवकरच सुरुवात! देवीच्या अखंड कृपादृष्टीसाठी घरात आजपासून करा या गोष्टी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shardiya navratri 2024: यंदा शनिवारी 03 ऑक्टोबरला शारदीय नवरात्र सुरु होत असून 12 ऑक्टोबरपर्यंत ते साजरं केलं जाणार आहे. अश्विन शुक्ल प्रतिपदेला नवरात्राचा पहिला दिवस असतो.
मुंबई : श्रावण महिना संपून गणेशोत्सव सुरु झाला की घराघराला नवरात्राचे वेध लागतात. शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातला एक प्रमुख सण आहे. पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजेच अश्विन किंवा सर्वपित्री अमावास्येनंतर दुसऱ्याच दिवशी नवरात्र सुरु होतं. यंदा शनिवारी 03 ऑक्टोबरला शारदीय नवरात्र सुरु होत असून 12 ऑक्टोबरपर्यंत ते साजरं केलं जाणार आहे. अश्विन शुक्ल प्रतिपदेला नवरात्राचा पहिला दिवस असतो. त्या निमित्ताने देवीची पूजाअर्चा आणि उपासना केली जाते. यात झाडांशी संबंधित व्रत आणि पूजाही केल्या जातात. नवरात्र सुरु होण्यापूर्वीच देवीच्या पुजेसाठी तुम्ही घरी काही रोपं लावू शकता. कोणती रोपं लावावीत याबाबत उन्नाव येथील ज्योतिषाचार्य ऋषिकांत मिश्र शास्त्री यांनी माहिती दिली आहे.
तुळस आपल्या संस्कृतीत अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ज्योतिषाचार्य ऋषिकांत मिश्र शास्त्री यांच्या मते हिंदू धर्मात अंगणात तुळस नसेल तर ते घर अपूर्ण वाटतं. तुमच्याकडे तुळस नसेल तर नवरात्रापूर्वी तुळशीचं रोप लावा. त्यामुळे देवी प्रसन्न होईल आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करेल.
प्राजक्त किंवा पारिजात यालाही आपल्या धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्राच्या सुरुवातीला प्राजक्ताचं रोप लावणं शुभ मानलं जातं. देवीला या दिवसात प्राजक्ताच्या फुलांची माळही घालता येते. त्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
advertisement
शंखपुष्पीच्या रोपामुळे घर आणि परिसरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. पांढऱ्या आणि जांभळ्या फुलांचा वापर नवरात्रात देवीच्या पूजेसाठी होऊ शकतो. हे रोपही तुम्ही नवरात्राच्या काळात लावू शकता. केळीचं झाड आपल्या धर्म आणि संस्कृतींत शुभ मानलं जातं. समृद्धीचं प्रतीकही मानलं जातं. नवरात्रात तुम्ही केळीच्या झाडाची पूजा करु शकता. त्यामुळे घरात सुखशांती नांदते. केळीचं झाड हे श्रीहरिच्या आवडीचं असल्यामुळे देवीलाही ते आवडतं असं मानलं जातं.
advertisement
हिंदूधर्मात नवरात्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घराघरात घटस्थापना केली जाते. घटस्थापनेच्या वेळी नऊ प्रकारचं धान्य पेरलं जातं. नऊ दिवसांत ते ज्या वेगाने उगवतं तशी घराची भरभराट होते असं मानलं जातं. अनेक जण नवरात्रानिमित्त नऊ दिवस उपवास करतात. स्त्रीशक्तीचा जागर म्हणूनही या सणाकडे पाहिलं जातं. नवरात्र पूर्ण झाल्यावर दहावा दिवस विजयादशमी म्हणजेच दसरा म्हणून साजरा केला जातो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 28, 2024 10:27 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shardiya navratri 2024: शारदीय नवरात्रीला लवकरच सुरुवात! देवीच्या अखंड कृपादृष्टीसाठी घरात आजपासून करा या गोष्टी







