Shravan Month 2025: तब्बल 21 वर्षानंतर आला श्रावणात अंगारकी चतुर्थीचा योग, अशी करा महादेवाची पूजा, होणार सुख प्राप्ती, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Shravan Month 2025: श्रावण महिना शिवभक्तांना उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. यंदा पवित्र असा श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू होताच 21 वर्षानंतर पहिल्यांदाच अंगारकी चतुर्थीचा उत्तम योग आला आहे.
नाशिक: आषाढ एकादशीनंतर महाराष्ट्रात श्रावणमास सुरु होत आहे. श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक सण उत्सव येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवाधिदेव महादेवाला श्रावण महिना समर्पित केला जातो. हा श्रावण महिना शिवभक्तांना उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. यंदा पवित्र असा श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू होताच 21 वर्षानंतर पहिल्यांदाच अंगारकी चतुर्थीचा उत्तम योग आला आहे. याविषयीच नाशिक येथील धर्मशास्त्र अभ्यासक डॉ. नरेंद्र धरणे यांनी माहिती दिली आहे.
शिवभक्तांसाठी श्रावणी सोमवारचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पहिला श्रावणी सोमवार 28 जुलैला आणि दुसरा 4 ऑगस्टला तर तिसरा 11 ऑगस्टला तसेच चौथा सोमवार हा 18 ऑगस्टला आलेला आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाला वाहिली जाणारी शिवमूठ शंकर उपासनेत अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याच श्रावणातील पहिला सण नागपंचमी हा 29 जुलैला आलेला आहे.
advertisement
अखंड सौभाग्य आणि धन-धान्य-समृद्धी यासाठी विवाहित स्त्रिया श्रावण सोमवारी महादेवाला शिवमूठ वाहतात. विवाहानंतर पहिली पाच वर्षे हे व्रत केले जाते. प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून महादेवाला बेलाची पाने, तांदूळ, सुपारी, गंध, फूल वाहून पूजा करावी, असं डॉ. नरेंद्र धरणे सांगतात.
advertisement
येत्या चार सोमवारी अशा प्रकारे महादेवाला अर्पण करावी शिवमूठ. पहिला सोमवार 28 जुलैला आहे या दिवशी तांदळाची शिवमूठ ही देवाला वाहावी. 4 ऑगस्ट दुसरा सोमवार या दिवशी तिळाची शिवमूठ महादेवाला अर्पण करावी. 11 ऑगस्ट तिसरा सोमवार या दिवशी मूग डाळीला महत्त्व देऊन देवाला अर्पण करावी. चौथा सोमवार हा 18 ऑगस्टला येत आहे या दिवशी जव मूठ अर्पण करावी.
advertisement
यंदा अंगारकीचे महत्त्व यासाठी
संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधले जाते. यामागची कथा ब्रह्मांडातील नवग्रहांपैकी मंगळ या ग्रहाशी निगडित आहे. 12 ऑगस्टला अंगारकी चतुर्थी असून 21 वर्षांनंतर हा योग येत आहे. बेल वाहून श्रावणी सोमवारचा उपवास सोडावा सुख प्राप्ती होईल, असंही डॉ. नरेंद्र धरणे यांनी सांगितलं.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
July 23, 2025 5:16 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shravan Month 2025: तब्बल 21 वर्षानंतर आला श्रावणात अंगारकी चतुर्थीचा योग, अशी करा महादेवाची पूजा, होणार सुख प्राप्ती, Video