Ashadh Amavasya 2025: आषाढ अमावास्येला जुळून आलाय गुरुपुष्यामृत योग, सोने खरेदीस योग्य वेळ कोणती? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Ashadh Amavasya 2025: गुरुपुष्यामृत योग हा शुभ कार्यासाठी, विशेषतः सोने, चांदी आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो.
मुंबई : यंदा श्रावण महिन्यापूर्वी येणाऱ्या आषाढ अमावास्येला 24 जुलै 2025 एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आला आहे. हा योग गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी दुपारी 4.43 ते रात्री 6.13 या कालावधीत गुरुपुष्यामृत योग सक्रिय असून, त्यानंतर आषाढ अमावास्येची रात्र सुरू होते जी 25 जुलै सकाळी 5.48 वाजेपर्यंत आहे.
advertisement
गुरुपुष्यामृत योग हा शुभ कार्यासाठी, विशेषतः सोने, चांदी आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. यंदा हा योग आषाढ अमावास्येशी एकत्र आल्यामुळे अनेकांना संभ्रम वाटत आहे की अशा वेळी खरेदी करणे योग्य ठरेल का? या विषयीची माहिती आदित्य जोशी गुरुजी यांनी दिली आहे.
advertisement
या संदर्भात मुंबईतील आदित्य जोशी गुरुजी यांनी सांगितले की, गुरुपुष्यामृत योग आणि आषाढ अमावस्या या दोन्हीच्या संयोगामुळे हा दिवस अत्यंत शुभ व प्रभावी मानला जातो. गुरुपुष्यामृत म्हणजे गुरुवारी येणारे पुष्य नक्षत्र ज्यामध्ये शनी आणि बृहस्पतीचा सकारात्मक प्रभाव असतो. त्यामुळे या काळात सोने खरेदी केल्यास ते दीर्घकाळ टिकणारे, संपत्ती वाढवणारे आणि समृद्धी करणारे ठरते.
advertisement
या वर्षी गुरुपुष्यामृत योग फक्त दीड तासांसाठी असला तरी, त्या वेळेत खरेदी केल्यास त्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधिक आहे. आषाढ अमावास्या ही चातुर्मासातील पहिली अमावास्या असल्याने पितृस्मरण, दानधर्म आणि अध्यात्मिक साधनेसाठीही हा दिवस महत्त्वाचा आहे.
म्हणूनच यंदाचा गुरुपुष्यामृत योग आणि आषाढ अमावास्या यांचा संयोग फक्त दुर्लभ नाही, तर सोने आणि चांदी खरेदीसाठी अत्यंत शुभ संधी आहे. ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनी दुपारी 4.43 ते 6.13 या शुभ मुहूर्ताचा लाभ घ्यावा, असा सल्ला ज्योतिष तज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
view comments
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 23, 2025 2:53 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ashadh Amavasya 2025: आषाढ अमावास्येला जुळून आलाय गुरुपुष्यामृत योग, सोने खरेदीस योग्य वेळ कोणती? Video