Asia Cup : '...तोपर्यंत भारताला ट्रॉफी द्यायची नाही', मोहसिन नक्वीचे कर्मचाऱ्यांना आदेश, कपचं लोकेशन समजलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
माझ्या परवानगीशिवाय ट्रॉफीला हात लावायचा नाही, असे आदेश मोहसीन नक्वीने एसीसीच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
लाहोर : आशिया कप ट्रॉफी दुबईतील आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) मुख्यालयात बंद ठेवण्यात आली आहे. माझ्या परवानगीशिवाय ट्रॉफीला हात लावायचा नाही, असे आदेश मोहसीन नक्वीने एसीसीच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय टीमने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वीने ट्रॉफी आपल्यासोबत घेतली आणि तेव्हापासून ती एसीसी कार्यालयात आहे. 28 सप्टेंबर रोजी दुबई येथे झालेल्या आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केले.
नक्वी हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (पीसीबी) अध्यक्ष आणि पाकिस्तानचा गृहमंत्री देखील आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.
नक्वीच्या जवळच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, 'आजपर्यंत ही ट्रॉफी दुबईतील एसीसी कार्यालयात आहे आणि नक्वीने स्पष्ट निर्देश दिले आहेत की ती त्याच्या परवानगीशिवाय आणि वैयक्तिक उपस्थितीशिवाय कोणालाही देऊ नये. नक्वीने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, तोच वैयक्तिकरित्या भारतीय टीमला किंवा बीसीसीआयला (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) ट्रॉफी देईल.
advertisement
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आशिया कप खेळवण्यात आला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. तसंच नक्वीने सोशल मीडियावर राजकीय विधानेही केली.
बीसीसीआयने ट्रॉफी घेऊन जाण्याच्या नक्वीच्या कृतीवर तीव्र आक्षेप घेतला आणि पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे. नक्वीवर कडक कारवाई करून त्याला आयसीसी संचालक पदावरून काढून टाकले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2025 7:35 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : '...तोपर्यंत भारताला ट्रॉफी द्यायची नाही', मोहसिन नक्वीचे कर्मचाऱ्यांना आदेश, कपचं लोकेशन समजलं!