Shree Swami Samarath : श्री स्वामी समर्थांचे आवडते पदार्थ कोणते? नैवेद्यात त्यांना काय दाखवायचं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Shree Swami Samarth : खास दिवस यादिवशी स्वामींना नैवेद्य दाखवला जातो. अशा वेळी अनेकांना प्रश्न पडतो की स्वामींना काय आवडतं, त्यांचे आवडते पदार्थ कोणते, त्यांना काय नैवेद्य दाखवायचा?
स्वामी समर्थांची भक्ती खूप लोक करतात. स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो घरी आणून त्यांची पूजा केली जाते. स्वामी समर्थ प्रकट दिन असो, स्वामींचा वार गुरुवार असो किंवा कोणता खास दिवस यादिवशी स्वामींना नैवेद्य दाखवला जातो. अशा वेळी अनेकांना प्रश्न पडतो की स्वामींना काय आवडतं, त्यांचे आवडते पदार्थ कोणते, त्यांना काय नैवेद्य दाखवायचा?
प्रत्येक देवाचे कोणता ना कोणते आवडीचे पदार्थ आवडीचे असतात. तसे स्वामींचे आवडते पदार्थ आहेत. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांना खाऊ घातले तर ते नक्कीच खूश होतील, प्रसन्न होतील. नैवेद्य म्हटलं की सामान्यपणे गोड पदार्थ येतात. पण स्वामींना तिखट पदार्थही आवडतात आणि तेसुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता.
advertisement
स्वामींना आवडणारे गोड पदार्थ
स्वामींना आवडणाऱ्या गोड पदार्थांमध्ये सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे पुरणपोळी. स्वामींचं पारायण असलं की उद्यापनाला लोक पुरणपोळीच दाखवता. तुम्हही तुपाची धार सोडलेली पुरणपोळी स्वामींना दाखवली तर ते आवडीने खातील.
advertisement
स्वामींना आवडणारा दुसरा गोड पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडू. त्यामुळे त्यांच्या प्रसादात बेसनाचे लाडू अवश्य असावेत. खमंग तुपात भाजलेल्या बेसनाचे लाडू ठेवलात तर स्वामींना आवडतील. स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तो नैवेद्य ग्रहणही करतील.
advertisement
तसंच बासुंदी पुरी आपण आवडीने खातो. स्वामींनादेखील ती आवडते. खीरही स्वामींच्या आवडीची त्यामुळे तुम्ही खीरपुरीही दाखवू शकता
स्वामींना आवडणारे तिखट पदार्थ
गोड पदार्थांशिवाय आणखी काही दुसरे पदार्थ विशेषतः तिखट काही दाखवायचं असेल तर तुम्ही कांदाभजी, कडबोळी दाखवू शकता. कांदाभजी म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. स्वामींनाही कांदाभजी आवडते. दिवाळीत घराघरात बनणारी कडबोळीही स्वामींना आवडते. स्वामींचे भक्त त्यांच्यासाठी कडबोळी आणायचे आणि स्वामी ती आवडीने खायचे.
advertisement
स्वामींसाठी एखाद पदार्थ नाही तर संपूर्ण ताट दाखवायचं असेल तर तुम्ही या ताटात नैवेद्य म्हणून, पुरणपोळी खीर, पुरणपोळी आमरास, कांदाभजी, आमटी, भात, पापड असे पदार्थ ठेवू शकता.
advertisement
पदार्थ नाही भक्तीभाव महत्त्वाचा
स्वामींचे हे पदार्थ आवडीचे आहेत. पण तुम्ही हेच त्यांना नैवेद्य म्हणून द्यायला हवेत असे नाहीत. सणवाराला तुम्ही त्यांच्या आवडीचे पदार्थ दाखवू शकतात पण असा काही नियम नाही. दहीभात, दूधभात पोहे, डाळभात जे तुम्ही तुमच्यासाठी शाकाहारी केलं आहे ते स्वामींना दाखवा. तुम्ही ताटात काय दिलं आहे हे स्वामी कधीच बघत नाही. पदार्थ नाही तर भक्ती आणि भाव महत्त्वाचा ठरतो. तुम्ही किती आवडीने, आनंदाने, प्रेमाने जेवणाचा नैवेद्य देतात ते पाहतात. तुम्ही आवडीने, प्रेमाने जे काही द्याल ते स्वामी खातील. तुम्ही जे दाखवाल ते स्वामींच्या आवडीचे पदार्थ होतील.
advertisement
(सूचना : ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठीने फक्त माहितीसाठी दिली आहे.)
Location :
Delhi
First Published :
August 12, 2025 6:01 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shree Swami Samarath : श्री स्वामी समर्थांचे आवडते पदार्थ कोणते? नैवेद्यात त्यांना काय दाखवायचं?