अयोध्येला जाण्याआधीच महाराष्ट्रात या ठिकाणी उभं राहतंय खास राम मंदिर, इतक्या कोटींचा केला खर्च Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
जालना शहारातील बडी सडकवरील प्रसिद्ध अशा श्रीराम मंदिराचा कळसारोहण सोहळा होत आहे. यासाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या भव्य मंदिरात प्रभू रामचंद्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. तोच मुहूर्त साधत जालना शहारातील बडी सडकवरील प्रसिद्ध अशा श्रीराम मंदिराचा कळसारोहण सोहळा होत आहे. यानिमित्त 21 आणि 22 जानेवारी रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जालना शहरातील राम मंदिर परिसराला अयोध्येचे स्वरूप प्राप्त होईल अशा प्रकारचे नियोजन करण्यात येत असल्याचे श्रीराम मंदिराचे पुजारी मनोज महाराज गौड यांनी सांगितले.
advertisement
कसा असेल कार्यक्रम?
21 जानेवारी रोजी कळसारोहण सोहळ्याला प्रारंभ होईल. सकाळी 8 वाजता आनंवाडी येथील श्रीराम मंदिरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्य आणि वेशभूषा असेल. शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून ही यात्रा जाणार आहे. या यात्रेचा समारोप श्रीराम मंदिर बडीसडक येथे होणार आहे. यानंतर सायंकाळी 6 वाजता मनोज महाराज गौड यांची एक शाम, हम सबके राम ही भजन संध्या होणार आहे. 22 जानेवारी रोजी मुख्य कळसारोहण सोहळा होणार आहे. सकाळी 7 ते 12 दरम्यान होम हवन, पूजन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
advertisement
श्रीरामांच्या गाभाऱ्यातील अगरबत्तीसोबत लोकांनी काढले फोटो! वाचा, काय आहेत वैशिष्ट्य?
दुपारी 12.30 या अभिजित मुहूर्तावर तुपेवाडी आश्रमाचे महंत बाल योगेश्वर खडकेश्वर बाबा यांच्या हस्ते कळस प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तर सायंकळी राम मंदिर परिसरात भव्य दीपोत्सव करण्यात येणार आहे. बडी सडक येथे असलेल्या श्रीराम मंदिराची स्थापना 120 वर्षांपूर्वी झाली आहे. 2009 ते 2014 दरम्यान या मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम झाले. या मंदिरासाठी राजस्थानातील धौलपूर येथून शिळा आणण्यात आल्या असून या शिळा गुलाबी पाषाणातील आहे. या मंदिराच्या कामात लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही. तब्बल 2 कोटी रूपये खर्च या मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी आला आहे.
advertisement
राजस्थान येथून येणार 65 किलोचा कळस, तर वस्रे येणार गुजरातमधून
कळसारोहण सोहळ्यासाठी येणारा कळसाची राजस्थानमध्ये निर्मिती करण्यात आली आहे. तर प्रभू श्रीराम यांची केशरी रंगाची वस्रे गुजरात राज्यातील बडोदरा येथील असतील. याचबरोबर, फुलांचे आकर्षक असे हार हे हैदराबाद येथून तर सजावटीसाठी फुले कोलकता येथून येणार असल्याचे पुजारी मनोजमहाराज गौड यांनी सांगितले.
advertisement
Ram Mandir Ayodhya: रामल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 22 जानेवारीचा मुहूर्त का निवडला?
दरम्यान, संपूर्ण हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व या कार्यक्रमात दिसावे म्हणून वेगवेगळे चित्ररथ देखील असणार आहेत. तब्बल 6 किमी लांब शोभायात्रा कळसारोहण सोहळ्यादरम्यान काढण्यात येणार आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
January 11, 2024 10:25 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
अयोध्येला जाण्याआधीच महाराष्ट्रात या ठिकाणी उभं राहतंय खास राम मंदिर, इतक्या कोटींचा केला खर्च Video