advertisement

वाईतील ढोल्या गणपतीची उंची खरंच कमी होतेय का? मत्स्याकार मंदिराचा अनोखा इतिहास, Video

Last Updated:

वाईतील कृष्णा नदीच्या पात्रात पुरातन गणपती मंदिर आहे. या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून गणेशमूर्तीही अनोखी आहे.

+
वाईतील

वाईतील ढोल्या गणपतीची उंची खरंच कमी होतेय का? मत्स्याकार मंदिरा अनोखा इतिहास, Video

शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा: कृष्णा नदीच्या काठी अनेक वेगवेगळ्या देवी-देवतांची मंदिरे आहेत. असंच एक अत्यंत पुरातन गणपती मंदिर सातारा जिल्ह्यातील वाईत आहे. मत्स्याकारात असणारं हे मंदिर 1762 मध्ये सरदार रास्ते यांनी बांधलं. या मंदिरामध्ये एका सलग दगडातून घडवलेली गणपतीची भव्य मूर्ती आहे. गणपतीच्या भव्य आणि विशाल आकारामुळे त्याला महागणपती किंवा ढोल्या गणपती असंही म्हटलं जातं. याच मंदिराबाबत विश्वस्त विश्वास गोखले यांनी माहिती दिलीय.
advertisement
अठराव्या शतकातील मंदिर
वाईतील प्रसिद्ध गणपती मंदिर हे अठराव्या शतकातील आहे. मराठा सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी 1762 मध्ये कृष्णा नदीच्या पात्रात हे मंदिर बांधलं. पाण्यापासून संरक्षणासाठी मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण करण्यात आलीय. तसेच या गर्भगृहाचं छत हा स्थापत्यशैलीचा अनोखा नमुना आहे. चुना आणि फरशीचा वापर करून छताच्या दगडाला खाचा पाडून दगडांच्या मदतीनेच तिथे सजावट करण्यात आली आहे. महागणपती मंदिराचं शिखर हे वाईतल्या सर्व मंदिरांमध्ये सर्वात उंच असल्याचं विश्वस्त सांगतात.
advertisement
मत्स्याकार बांधणीचं मंदिर
वाईतील प्रसिद्ध गणपती मंदिराची बांधणी ही मत्स्याकार स्वरुपाची आहे. कृष्णा नदीच्या पात्रात हे मंदिर असून पुराच्या पाण्यापासून संरक्षणाची योग्य ती काळजी घेण्यात आलीय. त्यासाठी गर्भगृहाच्या मागच्या भिंतीची रचना नावेच्या टोकासारखी म्हणजेच मत्स्याकार बांधलेली आहे. मत्स्याकार रचनेमुळे नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर पाणी दुभंगलं जातं. त्यामुळे पाण्याचा दाब कमी होतो आणि मंदिर सुरक्षित राहतं, असं गोखले सांगतात.
advertisement
कशी आहे गणेशमूर्ती?
या मंदिराच्या गर्भगृहामध्ये छोट्या चौथऱ्यावर गणपतीची भव्य डाव्या सोंडेची मूर्ती आहे. ही मूर्ती एकसंध काळ्या दगडात कोरलेली आहे. हा दगड कर्नाटकातून आणला असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली. सध्या या मूर्तीला भगवा रंग दिलेला आहे. त्यामुळे मूर्तीचा मूळ रंग दिसत नाही. हा गणपती दोन्ही मांड्या रोवून बसलेला आहे. या मूर्तीवर सुबक दागिने, यज्ञोपवित कोरलेलं आहे. गणपतीची मूर्ती ही आशीर्वाद देणारी नसून युद्धाला जात असलेली असल्याचे गोखले यांनी सांगितले.
advertisement
मंदिराबाबत आख्यायिका
या मंदिराबाबत काही आख्यायिका अनेक वर्षांपासून सांगण्यात येत आहेत. यात दरवर्षी हा गणपती थोडा थोडा लहान होत आहे असं सांगण्यात येतं. मात्र विश्वस्त विश्वास गोखले यांनी या सर्व आख्यायिका चुकीच्या असल्याचं सांगितलं. या गणपतीची उंची आहे तेवढीच आहे. मुकुट खराब झाल्याने गणपतीचा मुकुट आता गोलाकार केला आहे. त्यामुळे या मूर्तीची उंची कमी झाल्याचं भासत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/Temples/
वाईतील ढोल्या गणपतीची उंची खरंच कमी होतेय का? मत्स्याकार मंदिराचा अनोखा इतिहास, Video
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement