Phalgun Maas 2024: शेवटचा मराठी महिना या देवतेला समर्पित; फाल्गुनमध्ये या गोष्टींची खरेदी करणं टाळा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Phalgun Maas 2024: या महिन्यात काही गोष्टी विकत घेऊन घरी आणू नये, त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. फाल्गुन महिन्यात कोणत्या गोष्टींची खरेदी टाळावी. जाणून घेऊया ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून..
मुंबई : गेल्या अमावस्येपासून फाल्गुन महिना सुरू झाला आहे. हा हिंदू दिनदर्शिकेचा शेवटचा महिना आहे. या महिन्यानंतर येणाऱ्या चैत्र महिन्यापासून हिंदू नववर्ष सुरू होते. फाल्गुन महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जो व्यक्ती या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची विधिवत पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या महिन्यात काही गोष्टी विकत घेऊन घरी आणू नये, त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. फाल्गुन महिन्यात कोणत्या गोष्टींची खरेदी टाळावी. जाणून घेऊया ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून..
1. काळे कपडे खरेदी करू नका -
फाल्गुन महिन्यात काळ्या रंगाचे कपडे खरेदी करणे फार दुर्दैवी ठरू शकते. या महिन्यात पिवळ्या रंगाचे कपडे घालण्याला विशेष महत्त्व आहे. पिवळा रंग सकारात्मक ऊर्जा दर्शवतो. त्यामुळे या महिन्यात काळ्या रंगाचे कपडे घेणे टाळावे. ते अशुभ मानले जाते आणि त्याचे अशुभ परिणाम प्राप्त होतात.
advertisement
2. तीक्ष्ण वस्तू खरेदी करू नका
फाल्गुन महिन्यात तीक्ष्ण वस्तू खरेदी करणे योग्य मानले जात नाही. असे मानले जाते की या महिन्यात धारदार वस्तू खरेदी करून घरी आणल्यानं घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात. कुटुंबात कलहाची परिस्थिती निर्माण होते. फाल्गुन महिन्यात अशा वस्तू खरेदी करून घरी आणल्यानेही शनिदोष होऊ शकतो.
advertisement
3. तांब्याच्या वस्तू खरेदी करू नका
फाल्गुन महिन्यात तांब्याशी संबंधित कोणतीही वस्तू खरेदी करणे शुभ नाही. असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्याची स्थिती कमकुवत होऊ शकते. त्यामुळे फाल्गुन महिन्यात तांबे किंवा तांब्याशी संबंधित कोणत्याही वस्तू खरेदी करणे टाळावे.
4. काचेच्या वस्तू खरेदी करू नका
फाल्गुन महिन्यात काचेच्या वस्तू खरेदी करणे चांगले मानले जात नाही. काच शुक्राचे प्रतिनिधित्व करते, या महिन्यात काचेच्या वस्तू खरेदी केल्याने शुक्रदोष होऊ शकतो. यामुळे व्यक्तीला भौतिक सुखांमध्ये अडचणी येऊ लागतात. त्यामुळे फाल्गुन महिन्यात काच किंवा काचेच्या कोणत्याही वस्तू खरेदी करू टाळावे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 12, 2024 12:05 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Phalgun Maas 2024: शेवटचा मराठी महिना या देवतेला समर्पित; फाल्गुनमध्ये या गोष्टींची खरेदी करणं टाळा