Tulsi Vivah 2023: तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त किती वाजता? प्रदोष व्रत आणि शुक्रवारचा असा योगायोग

Last Updated:

Tulsi Vivah 2023 date muhurat: तुळशी विवाह केल्यानं कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येईल. लक्ष्मीच्या कृपेने धन-समृद्धी वाढेल. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते.

News18
News18
मुंबई, 24 नोव्हेंबर : यावर्षी तुळशी विवाहाच्या दिवशी तीन शुभ योग तयार होत असून, त्यासोबतच प्रदोष व्रत आणि शुक्रवारचा योगायोग जुळून आला आहे. या दिवशी तुम्हाला शंभू महादेवासह भगवान विष्णू, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो. यामुळे तुमच्या कुटुंबात सुख-समृद्धी वाढेल आणि महादेवाच्या कृपेने तुमची सर्व दुःखे संपुष्टात येतील. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त, आणि आज कोणते शुभ संयोग आणि योगायोग घडत आहेत, याविषयी जाणून घेऊ.
तुळशी विवाह 2023: 3 शुभ योगायोग संपत्ती आणि समृद्धी वाढवतील
यावर्षी तुळशी विवाह आज शुक्रवार, 24 नोव्हेंबर रोजी आहे. आजच शुक्र प्रदोष व्रत आहे आणि आज नित्य शुक्रवारी लक्ष्मीचीही पूजा केली जाते. तुळशी विवाह केल्यानं कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येईल. लक्ष्मीच्या कृपेने धन-समृद्धी वाढेल. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. शुक्र प्रदोष मुहूर्तावर महादेवाची पूजा केल्यानं तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल.
advertisement
तुळशीविवाह आणि शुक्र प्रदोष व्रत 3 शुभ योगांमध्ये -
24 नोव्हेंबरला तुळशी विवाह आणि शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत. अमृत​सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि सिद्धी योग तयार होत आहेत. दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग आहे. आज सर्वार्थ सिद्धी योगात तुळशी विवाह आणि शुक्र प्रदोष व्रताची पूजा होईल.
advertisement
आज सिद्धी योग सूर्योदयापासून सकाळी 09:05 पर्यंत आहे, त्यानंतर व्यतिपात योग सुरू होईल. तुलसी विवाहाच्या दिवशी सकाळी 06:51 ते दुपारी 04:01 पर्यंत अमृत सिद्धी योग आहे. रेवती आणि अश्विनी नक्षत्र असतील.
तुळशी विवाहाचा मुहूर्त कधी 2023 -
आज 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 05:25 पासून सुरू होणार आहे.
advertisement
तुळशी विवाह 2023 तिथी मुहूर्त -
कार्तिक शुक्ल द्वादशी तिथीचा प्रारंभ: 23 नोव्हेंबर, रात्री 09:01 वा.
कार्तिक शुक्ल द्वादशी तिथीची समाप्ती: 24 नोव्हेंबर, संध्याकाळी 07:06 वाजता
शुक्र प्रदोष व्रताची पूजा कधी होईल?
कार्तिक शुक्ल त्रयोदशी तिथीचा प्रारंभ: 24 नोव्हेंबर, संध्याकाळी 7:06 वा.
कार्तिक शुक्ल त्रयोदशी तिथीची समाप्ती: 25 नोव्हेंबर, संध्याकाळी 5:22 वाजता
advertisement
शुक्र प्रदोष पूजेची शुभ वेळ: संध्याकाळी 07:06 ते रात्री 08:06
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Tulsi Vivah 2023: तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त किती वाजता? प्रदोष व्रत आणि शुक्रवारचा असा योगायोग
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement