Shukra Pradosh Vrat 2023: सर्वार्थ सिद्धी योगात आज शुक्र प्रदोष व्रत! पहा शिव पूजेचा मुहूर्त, पूजन विधी-महत्त्व

Last Updated:

Shukra Pradosh Vrat 2023 puja vidhi: केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊ, प्रदोष व्रताचे महत्त्व, शुक्र प्रदोष व्रताची पूजा वेळ कोणती? त्या दिवशी कोणते शुभ संयोग तयार होत आहेत?

News18
News18
मुंबई, 24 नोव्हेंबर : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला आज प्रदोष व्रत आहे. हे नोव्हेंबर 2023 मधील शेवटचं प्रदोष व्रत आहे. आज सर्वार्थ सिद्धीसह 3 शुभ योग तयार होत आहेत. हे व्रत आज शुक्रवारी असल्यानं शुक्रप्रदोष व्रत आहे. शुक्र प्रदोषाचे व्रत ठेवून विधीनुसार भगवान शंकराची पूजा केल्यानं वैवाहिक जीवन सुखी होते आणि सौभाग्य वाढते. केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊ, प्रदोष व्रताचे महत्त्व, शुक्र प्रदोष व्रताची पूजा वेळ कोणती? त्या दिवशी कोणते शुभ संयोग तयार होत आहेत?
प्रदोष व्रत कधी आहे?
वैदिक दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी शुक्रवार, 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:06 वाजता सुरू होईल. ही तिथी शनिवार, 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:22 वाजता संपेल. 25 नोव्हेंबरला प्रदोष काळात पूजेसाठी शुभ मुहूर्त नसल्यामुळे प्रदोष व्रत 24 नोव्हेंबरला पाळले जाईल.
प्रदोष व्रत नोव्हेंबर 2023 पूजा मुहूर्त -
24 नोव्हेंबर रोजी प्रदोष व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 07:06 पासून सुरू होतो आणि रात्री 08:06 पर्यंत असेल. प्रदोष व्रतामध्ये शिवपूजेसाठी 1 तासाचा शुभ मुहूर्त मिळेल.
advertisement
सर्वार्थ सिद्धी योगात प्रदोष व्रताची पूजा -
नोव्हेंबरच्या शेवटच्या प्रदोष व्रतासाठी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, सिद्धी योग आणि व्यतिपात योग तयार होत आहेत. यामध्ये पहिले तीन योग शुभ आहेत. जेव्हा तुम्ही संध्याकाळी प्रदोष व्रताची पूजा कराल, त्या वेळी सर्वार्थ सिद्धी योग असेल.
advertisement
प्रदोषाच्या दिवशी संपूर्ण दिवस सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे, तर अमृत सिद्धी योग सकाळी 06:51 ते दुपारी 04:01 पर्यंत असेल. सिद्धी योग पहाटेपासून 09.05 पर्यंत आहे. त्यानंतर व्यतिपात योग सुरू होईल, जो संपूर्ण रात्रभर चालेल. त्या दिवशी रेवती नक्षत्र सकाळपासून ते दुपारी 04.01 पर्यंत आहे. त्यानंतर अश्विनी नक्षत्र असेल. प्रदोष व्रताच्या दिवशी पंचक सकाळी 06.51 ते दुपारी 04.01 पर्यंत आहे.
advertisement
शुक्र प्रदोष व्रताचे महत्त्व -
दिवसानुसार प्रदोष व्रताचे महत्त्वही बदलते. पुत्रप्राप्तीसाठी शनि प्रदोष व्रत पाळले जाते. तसेच शुक्र प्रदोष व्रत करून महादेवाची पूजा केल्यानं वैवाहिक जीवन सुखी होते. शिवाच्या कृपेने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.
शुक्र प्रदोष व्रत आणि उपासना पद्धत
1. सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला. सूर्यदेवाला जल अर्पण करा. त्यानंतर शुक्र प्रदोष व्रत व शिवपूजनाचा संकल्प करावा, त्यानंतर नित्य पूजा करावी.
advertisement
2. दिवसभर फळांचा आहार घ्यावा, अन्न सेवन करू नका. संध्याकाळी शिव मंदिरात किंवा घरी सर्वार्थ सिद्धी योग आणि प्रदोष व्रताची पूजा करा.
3. सर्वप्रथम शिवलिंगाला गंगाजल आणि गाईच्या दुधाने अभिषेक करा. त्यानंतर भगवान शंकराला बेलपत्र, भांग, अक्षत, धतुरा, शमीची पाने, फुले, फळे, मध, नैवेद्य, धूप, दिवा इत्यादी अर्पण करा.
4. या दरम्यान ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. नंतर शिव चालिसा व शुक्र प्रदोष व्रताची कथा वाचावी. त्यानंतर भगवान शंकराची आरती करावी. पूजा केल्यानंतर मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा.
advertisement
5. रात्री जागरण करू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान, ध्यान आणि पूजा करावी. गरीब ब्राह्मणाला अन्न, वस्त्र, फळे दान करा. त्यांना दक्षिणा देऊन निरोप द्या.
6. यानंतर, स्वतः जेवण करून उपवास सोडा. जर तुम्ही विवाहित असाल तर पती-पत्नी दोघांनीही हे व्रत पाळावे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shukra Pradosh Vrat 2023: सर्वार्थ सिद्धी योगात आज शुक्र प्रदोष व्रत! पहा शिव पूजेचा मुहूर्त, पूजन विधी-महत्त्व
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement