Griha Pravesh Muhurat: आज संपतोय चतुर्मास! गृह प्रवेशासाठी मिळणार मुहूर्त, नोव्हेंबर ते एप्रिल 2024
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Griha Pravesh Muhurat: आज आम्ही तुम्हाला नोव्हेंबर 2023 ते एप्रिल 2024 पर्यंतच्या गृहप्रवेश मुहूर्ताबद्दल सांगत आहोत. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांनी गृह प्रवेश मुहूर्तांची माहिती दिली आहे.
मुंबई, 23 नोव्हेंबर : चतुर्मास आज गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी संपत आहे. आज प्रबोधिनी एकादशी आहे. आज भगवान विष्णू योग निद्रेतून बाहेर पडतात, असं मानलं जातं. चतुर्मास संपल्याने शुभ कार्ये आता सुरू होतील. आजपासून लग्न, गृहप्रवेश, जावळ यासारख्या शुभ कार्यांना सुरुवात होईल. जे गृहप्रवेश करू इच्छितात, त्यांना आजपासून गृहप्रवेश मुहूर्त मिळण्यास सुरुवात होणार आहे. आज आम्ही तुम्हाला नोव्हेंबर 2023 ते एप्रिल 2024 पर्यंतच्या गृहप्रवेश मुहूर्ताबद्दल सांगत आहोत. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांनी गृह प्रवेश मुहूर्तांची माहिती दिली आहे.
पंचागामध्ये सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंतची तारीख मानली जाते. खाली दिलेला गृहप्रवेशाचा शुभ मुहूर्तही त्याच आधारावर आहे, ज्यामध्ये तुम्हाला 30 वाजेपर्यंत म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी 06 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त दिले आहेत. गृहप्रवेशासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत ते पाहूया.
नोव्हेंबर 2023 मध्ये गृहप्रवेशासाठी शुभ मुहूर्त तीन दिवस आहेत, तर डिसेंबरमधील 4 दिवस गृहप्रवेशासाठी शुभ मुहूर्त आहे. जानेवारी 2024 मध्ये एक दिवस, फेब्रुवारीमध्ये 6 दिवस, मार्चमध्ये 8 दिवस आणि एप्रिलमध्ये फक्त एक दिवस गृहप्रवेश मुहूर्त आहे.
advertisement
नोव्हेंबर 2023 चे गृह प्रवेश मुहूर्त -
23 नोव्हेंबर, गुरुवार, मुहूर्त: 06:50 ते 21:01
27 नोव्हेंबर, सोमवार, मुहूर्त: 14:45 ते 30:54+
29 नोव्हेंबर, बुधवार, मुहूर्त: 06:54 ते 13:59
डिसेंबर 2023 गृह प्रवेश मुहूर्त -
6 डिसेंबर, बुधवार, मुहूर्त: 27:04+ ते 30:29+
8 डिसेंबर, शुक्रवार, मुहूर्त: 08:54 ते 30:31+
15 डिसेंबर, शुक्रवार, मुहूर्त: 08:10 ते 22:30
advertisement
21 डिसेंबर, गुरुवार, मुहूर्त: 09:37 ते 22:09
जानेवारी 2024 चा गृहप्रवेश मुहूर्त
3 जानेवारी, बुधवार, मुहूर्त: 07:14 ते 14:46
फेब्रुवारी 2024 चा गृह प्रवेश मुहूर्त
12 फेब्रुवारी, सोमवार, मुहूर्त: 14:56 ते 17:44
14 फेब्रुवारी, बुधवार, मुहूर्त: 07:01 ते 10:43
advertisement
19 फेब्रुवारी, सोमवार, वेळ: 06:57 ते 10:33
26 फेब्रुवारी, सोमवार, मुहूर्त: 06:50 ते 28:31+
28 फेब्रुवारी, बुधवार, मुहूर्त: 28:18+ ते 30:47+
29 फेब्रुवारी, गुरुवार, मुहूर्त: 06:47 ते 10:22
मार्च 2024 चा गृह प्रवेश मुहूर्त -
2 मार्च, शनिवार, मुहूर्त: 14:42 ते 30:44+
6 मार्च, बुधवार, मुहूर्त: 14:52 ते 28:13+
11 मार्च, सोमवार, मुहूर्त: 10:44 ते 30:34+
advertisement
15 मार्च, शुक्रवार, मुहूर्त: 22:09 ते 30:29
16 मार्च, शनिवार, मुहूर्त: 06:29 ते 21:38
27 मार्च, बुधवार, मुहूर्त: 06:17 ते 16:16
29 मार्च, शुक्रवार, मुहूर्त: 20:36 ते 30:13+
30 मार्च, शनिवार, मुहूर्त: 06:13 ते 21:13
एप्रिल 2024 चा गृह प्रवेश मुहूर्त -
view comments3 एप्रिल, बुधवार, वेळ: 18:29 ते 21:47
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2023 11:47 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Griha Pravesh Muhurat: आज संपतोय चतुर्मास! गृह प्रवेशासाठी मिळणार मुहूर्त, नोव्हेंबर ते एप्रिल 2024


