Kartiki Yatra : भाविकांसाठी आनंदाची बातमी, कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरपूरात घेता येणार 24 तास विठ्ठल दर्शन
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
कार्तिकी यात्रेला महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांतून सुद्धा भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला येतात. कार्तिकी यात्रेला येणाऱ्या भक्तगणांना सर्व सुविधा मंदिर समिती देणार आहे.
सोलापूर : कार्तिकी यात्रेला महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांतून सुद्धा भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला येतात. कार्तिकी यात्रेला येणाऱ्या भक्तगणांना सर्व सुविधा मंदिर समिती देणार आहे. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत विठ्ठल रुक्माईचे दर्शन 24 तास राहणार असल्याची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
कार्तिकी यात्रा 2 नोव्हेंबर रोजी आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीची पूर्वनियोजित बैठक झाली. मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज म्हणाले की, येत्या 2 नोव्हेंबर रविवारी पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते श्री विठ्ठल - रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. कार्तिकी यात्रा कालावधीत सुमारे 9 ते 10 लाख भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाकरिता येतात. दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीकडून आषाढी यात्रेप्रमाणेच आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
advertisement
आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्री वारी या महत्त्वाच्या चार वाऱ्या आहेत. यापैकी महत्त्वाची असणारी दुसरी वारी म्हणजे कार्तिकी एकादशी. या बैठकीस सदस्या शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच पुरातत्व विभागाचे डॉ. विलास वाहणे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, जतन संवर्धन कामाचे ठेकेदार तसेच सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
October 06, 2025 9:40 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Kartiki Yatra : भाविकांसाठी आनंदाची बातमी, कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरपूरात घेता येणार 24 तास विठ्ठल दर्शन