सूर्याला अर्घ्य देण्याची योग्य पद्धत कोणती? कधी करावी पूजा, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आयुष्यात प्रगती व्हावी,कामांमध्ये यश प्राप्त व्हावं आणि कुटुंबावर सुर्यदेवांचा आशीर्वाद राहवा यासाठी सूर्याला सकाळी सूर्योदय झाल्यानंतर अर्घ्य दिले जाते.
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा : आयुष्यात प्रगती व्हावी,कामांमध्ये यश प्राप्त व्हावं आणि कुटुंबावर सुर्यदेवांचा आशीर्वाद राहवा यासाठी सूर्याला सकाळी सूर्योदय झाल्यानंतर अर्घ्य दिले जाते. म्हणजेच जल अर्पण केले जाते. मात्र, जल अर्पण करतानाचे काही नियम सांगितले जातात. कोणते आहेत ते नियम? यासंदर्भातच वर्धा येथील महाराज पं. हेमंत शास्त्री पाचखेडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
या वेळेत अशी करा पूजा
दररोज सकाळी पाच वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंतचा वेळ सूर्यनारायणाच्या पूजेचा असल्याचं सांगण्यात आले आहे. पूजन करत असताना अर्घ्य देत असताना एका तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घ्यायचं. त्यामध्ये गंध, अक्षद, पुष्प, हळदी, कुंकू, टाकायचं. आणि विशेषतः तुळशीपत्र टाकायचं. एका पायावर उभे राहून जल अर्पण करायचं. डावा पाय वर करून सूर्याला अर्घ्य द्यावं, असं पं. हेमंत शास्त्री पाचखेडे यांनी सांगितलं.
advertisement
पूजा-विधींमध्ये या 4 रंगांचाच का करतात वापर? रंगाची खासियत, काय आहे धार्मिक महत्त्व
अशावेळी गायत्री मंत्र आणि सूर्याची विविध नावे घेऊन ओम भास्कराय नमः ओम आदित्य नमः अशा प्रकारे नामस्मरण करून जल अर्पण करावे. जल अर्पण करताना तांब्या किंवा लोटा हा हातात आपल्या उंचीच्या वर पकडावा आणि मन, बुद्धी,चित्त शांत ठेवून जल अर्पण करावे, असं पं. हेमंत शास्त्री पाचखेडे यांनी सांगितलं.
advertisement
...तर कुंडलीत असू शकतो कालसर्प दोष, वेळीच ओळखा नाहीतर व्हाल उद्ध्वस्त!
तर सूर्याला जल अर्पण करताना शरीर आणि मन स्वच्छ, शांत ठेवावं. सूर्याला अर्घ्य देताना आपल्या पायावर ते पाणी उडणार नाही याची काळजी घ्यावी, असंही पं. हेमंत शास्त्री पाचखेडे यांनी सांगितलं आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
March 09, 2024 2:32 PM IST

