22 जानेवारीला जन्मणाऱ्या बाळाची कुंडली पाहा, नेमक्या कोणत्या राशीचं असेल बाळ?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
देशातल्या अनेक गरोदर महिलांनी आपली प्रसूती याच दिवशी व्हावी, अशी विनंती डॉक्टरांकडे केली आहे.
सच्चिदानंद, प्रतिनिधी
पाटणा : 22 जानेवारीला अयोध्येच्या भव्य मंदिरात श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना संपन्न होईल. हा दिवस अतिशय शुभ मानला जातोय, शिवाय या सोहळ्याबाबत देशभरात आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी ज्योतिषांनी अत्यंत दुर्मीळ असा शुभ मुहूर्त निवडला आहे. म्हणूनच देशातल्या अनेक गरोदर महिलांनी आपली प्रसूती याच दिवशी व्हावी, अशी विनंती डॉक्टरांकडे केली आहे. त्यामुळे जाणून घेऊया 22 जानेवारीला जन्मणाऱ्या बाळाचं भाग्य नेमकं असेल तरी कसं?
advertisement
बिहारच्या पाटणा भागातील प्रसिद्ध ज्योतिषी डॉक्टर श्रीपती त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारीला जन्मणारं बाळ अत्यंत नशीबवान असेल. त्याचा भाग्योदय कमी वयात होईल. ते आपल्या करियरमध्ये कायम आघाडीवर असेल.
22 जानेवारीला पौष शुक्ल पक्ष आहे आणि सोबतच सोमवारचा दिवस आणि द्वादशी आहे. या दिवशी ज्या बाळांचा जन्म होईल, त्या सर्वांची रास वृषभ असेल. या राशीत चंद्राचा प्रभाव सर्वाधिक असतो, जे बाळासाठी फायदेशीर ठरेल.
advertisement
या बाळांवर शुक्राचाही प्रभाव असेल. कुंडलीत लग्न स्थान आणि मेष राशीचं चांगलं मिलन आहे. शिवाय याच स्थानात गुरू ग्रहदेखील विराजमान आहे. तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या घरात कोणताही ग्रह नाही. सहाव्या घरात केतू विराजमान आहे, तर सातव्या घरात शुक्र आहे, जो भाग्य स्थानात आहे. आठव्या घराचा स्वामी भाग्य स्थानात आहे. तर, नवव्या घराचा स्वामी लग्न स्थानात आहे. याचाच अर्थ असा की, बाळाचा कमी वयात भाग्योदय होईल. कुंडलीच्या दहाव्या स्थानात सूर्य ग्रह आहे. तर, शनी आपल्याच घरात विराजमान आहे आणि बाराव्या स्थानात राहू आहे.
advertisement
बाळासाठी कुंडली उत्तम
एकूणच कुंडलीतून असं दिसतंय की, श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी जन्म घेणारं बाळ अत्यंत नशीबवान असेल. श्रीरामांसारखे पराक्रमी गुण त्याच्यात असतील. शिवाय त्याला पदोपदी त्याचं भाग्य साथ देईल. बाळ महत्त्वाकांक्षी असेलच आणि आपल्या आयुष्यात कायम यशाच्या शिखरावर राहील.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Patna,Bihar
First Published :
January 17, 2024 7:00 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
22 जानेवारीला जन्मणाऱ्या बाळाची कुंडली पाहा, नेमक्या कोणत्या राशीचं असेल बाळ?