Cricket News : ऑस्ट्रेलियाविरुद्ध आता T20 मुकाबला, मुंबईचा माणूस कर्णधार तर महाराष्ट्राचा उपकर्णधार, BCCI ने जाहीर केली टीम इंडिया
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
टीम इंडियाच्या पुढच्या सीरिजचं वेळापत्रक समोर आलं असून आता बीसीसीआयने यासाठी टीम इंडियाचा संघ देखील जाहीर केला आहे.
मुंबई, 20 नोव्हेंबर : वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला आणि सहाव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर कब्जा केला. वर्ल्ड कप संपल्यानंतर लगेचच टीम इंडिया पुढच्या सीरिजच्या तयारीला लागली आहे. टीम इंडियाच्या पुढच्या सीरिजचं वेळापत्रक समोर आलं असून आता बीसीसीआयने यासाठी टीम इंडियाचा संघ देखील जाहीर केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आता टी-20 सीरिज होणार आहे. 5 मॅचची ही सीरिज भारतात होणार आहे. सीरिजची पहिली टी-20 मॅच 23 नोव्हेंबरला विशाखापट्टणमला होईल, तर दुसरी मॅच 26 नोव्हेंबरला तिरुवनंतपुरमला, तिसरी मॅच 28 नोव्हेंबरला गुवाहाटीमध्ये, चौथी मॅच 1 डिसेंबरला नागपूर आणि पाचवी मॅच 3 डिसेंबरला हैदराबादमध्ये होईल. हे पाचही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील.
advertisement
बीसीसीआयने आगामी टी 20 मालिकेसाठी आता टीम इंडियाची घोषणा केली असून यात अनेक अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यात बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी कर्णधार पदाची जबाबदारी सूर्यकुमार यादववर सोपवली असून उपकर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाड याची निवड केली आहे. यासह आयपीएलमध्ये केकेआरचा मॅच विनर रिंकू सिंहला देखील संधी देण्यात आली आहे.
advertisement
NEWS #TeamIndia’s squad for @IDFCFIRSTBank T20I series against Australia announced.
Details #INDvAUShttps://t.co/2gHMGJvBby
— BCCI (@BCCI) November 20, 2023
टीम इंडियाचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2023 10:17 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Cricket News : ऑस्ट्रेलियाविरुद्ध आता T20 मुकाबला, मुंबईचा माणूस कर्णधार तर महाराष्ट्राचा उपकर्णधार, BCCI ने जाहीर केली टीम इंडिया