शमी-आकाश दीपला बेदम चोपला... 13 सिक्स ठोकून डबल सेंच्युरी, अमेरिकेतून आला अन् धमाका केला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
अमेरिकेमध्ये जन्म झालेल्या खेळाडूने विजय हजारे ट्रॉफीमध्ये बंगालसारख्या मजबूत बॉलिंग आक्रमणाविरुद्ध डबल सेंच्युरी ठोकली आहे.
राजकोट : अमेरिकेमध्ये जन्म झालेल्या खेळाडूने विजय हजारे ट्रॉफीमध्ये बंगालसारख्या मजबूत बॉलिंग आक्रमणाविरुद्ध डबल सेंच्युरी ठोकली आहे. हैदराबादच्या अमन रावने ही धमाकेदार कामगिरी केली आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या एलीट ग्रुपच्या सामन्यात अमनने 154 बॉलमध्ये 200 रनची नाबाद खेळी केली, यात त्याने 12 फोर आणि 13 सिक्स ठोकले. अमनने 129.87 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. त्याच्या या द्विशतकामुळे हैदराबादने 352/5 पर्यंत मजल मारली.
अमन रावने त्याचं द्विशतक इनिंगच्या शेवटच्या बॉलला सिक्स मारून पूर्ण केलं. अमनने त्याच्या 200 रनपैकी 120 रन मोहम्मद शमी, आकाश दीप आणि मुकेश कुमार या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या फास्ट बॉलरविरुद्ध केल्या. या तीनही फास्ट बॉलरना 233 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बॉलिंग करण्याचा अनुभव आहे.
शमीने 10 ओव्हरमध्ये दिल्या 70 रन
मोहम्मद शमीने 10 ओव्हरमध्ये 70 रन देऊन 3 विकेट घेतल्या. तर आकाश दीपने 8 ओव्हरमध्ये एकही विकेट न देता 78 रन आणि मुकेश कुमारने 7 ओव्हरमध्ये 55 रन दिल्या.
advertisement
आयपीएल खेळणार अमन राव
आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये अमन रावला राजस्थान रॉयल्सने 30 लाखांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं आहे. विजय हजारे ट्रॉफीमधील अमन रावची ही फक्त तिसरी मॅच आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये अमन रावने मुंबईविरुद्ध वादळी अर्धशतक ठोकलं होतं. शार्दुल ठाकूरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने 24 रन काढले होते.
view commentsLocation :
Rajkot,Gujarat
First Published :
Jan 06, 2026 7:28 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
शमी-आकाश दीपला बेदम चोपला... 13 सिक्स ठोकून डबल सेंच्युरी, अमेरिकेतून आला अन् धमाका केला!











