हिंदू विद्यार्थिनीवर नमाजाची जबरदस्ती, वाड्याच्या कॉलेजच्या होस्टेलमधील घटना
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या अधीक्षिका आणि सहकारी विद्यार्थिनीला बळजबरी करून हिंदू विद्यार्थिनीला नमाज पठनासाठी भाग पाडले.
वाडा, पालघर : वाडा तालुक्यातील एका महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या हिंदू विद्यार्थिनीला जबरदस्तीने नमाज पठण करायला लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या अधीक्षिका आणि सहकारी विद्यार्थिनीला बळजबरी करून हिंदू विद्यार्थिनीला नमाज पठनासाठी भाग पाडले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार दिवसांपूर्वी तिने महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. महाविद्यालयाच्या वसतिगृहात संबंधित तरुणी राहत होती. महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या अधीक्षिका आणि वसतिगृहातील मुलींनी हिंदू विद्यार्थिनीला नमाज पठन करायला लावले. घडलेल्या घटनेची माहिती मुलीने दुसऱ्या दिवशी वडिलांना दिली.
मुलीने महाविद्यालय प्रशासनाने संबंधित घटनेची तक्रार केली. परंतु त्यांनी प्रकरण गांभीर्याने न घेता उडावाउडवीची उत्तरे दिली. घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे मुलीला सांगण्यात आले. त्यानंतर मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पालघरचे पोलीस अधीक्षक यतिन देशमुख यांनी महाविद्यालयात येऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. पोलीस यासंदर्भात अधिक चौकशी करीत आहेत.
advertisement
अनेक महाविद्यालयात रॅगिंग संदर्भात तक्रारी येत असतात, येत आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी अजिबात घाबरून न जाता न्यायासाठी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक यतिन देशमुख यांनी केले.
view commentsLocation :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 9:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हिंदू विद्यार्थिनीवर नमाजाची जबरदस्ती, वाड्याच्या कॉलेजच्या होस्टेलमधील घटना











