काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर हल्ला करून 'कालू' फरार, पोलिसांनी सहा तासांत मुसक्या आवळल्या

Last Updated:

Hidayat Patel Attack Case: हिदायत पटेल यांच्यावर अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील त्यांच्या मोहाळा गावात जीवघेणा हल्ला झाला.

हिदायत पटेल हल्ला प्रकरण
हिदायत पटेल हल्ला प्रकरण
कुंदन जाधव, प्रतिनिधी, अकोला : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावरील हल्ला प्रकरणात आरोपी उमेद उर्फ कालू पटेल याला पोलिसांनी ताब्यात घेतले. हिदायत पटेल यांच्यावर हल्ला करून हल्लोखोर पसार झाला होता. पोलिसांनी आरोपीला सहा तासांत बेड्या ठोकल्या.
हिदायत पटेल यांच्यावर अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील त्यांच्या मोहाळा गावात जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मोहाळा हे हिदायत पटेल यांचे मूळ गाव. याच गावात ते गेले असताना मदीन उर्फ कालू पटेल याने आणि त्याच्या समर्थकांनी पटेल यांच्यावर चाकूने वार केले. हिदायत पटेल मशि‍दीतून बाहेर पडत असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला.
advertisement

हल्ला करून कालूने पळ काढला, पोलिसांनी सहा तासात बेड्या ठोकल्या

आरोपी उमेद उर्फ कालू पटेल याने हल्ला करून पळ काढला. स्थानिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी कालू पटेल तिथून निसटण्यात यशस्वी झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीच्या मागावर पथके पाठवली. सहा तासांत आरोपी कालू याला बेड्या ठोकण्यात अकोला पोलिसांना यश आले. आरोपी कालू याला पणज येथून अटक करण्यात आली.
advertisement

हिदायत पटेल यांच्या मानेवर वार, गंभीर जखमी

हिदायत पटेल यांच्या मानेवर आरोपीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. गंभीर अवस्थेत सुद्धा हिदायत पटेल यांनी स्वतःला सांभाळले. मला लवकर पाणी द्या, अशी विनंती तेथील स्थानिकांना त्यांनी केली. दवाखान्यात जायला लवकर गाडी आणा, अशी विनंती त्यांच्या नात्यातीलच एकाने स्थानिकांना केली.

राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती

advertisement
हिदायत पटेल यांचे गावातील पटेल कुटुंबातील एकाशी गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वाद सुरू होते. या वादातूनच हिदायत पटेल यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर हल्ला करून 'कालू' फरार, पोलिसांनी सहा तासांत मुसक्या आवळल्या
Next Article
advertisement
BMC Election: फोटो गायब! काँग्रेसच्या महिला उमेदवारांनी प्रचारातून स्वतःलाच  वगळलं, काय आहे प्रकरण?
फोटो गायब! काँग्रेसच्या महिला उमेदवारांनी प्रचारातून स्वतःलाच वगळलं, काय आहे प्
  • काँग्रेसच्या काही मुस्लिम महिला उमेदवारांचा प्रचार वेगळ्याच कारणामुळे चर्चेत

  • महिला उमेदवारांनी स्वतःचे छायाचित्र टाळून पती किंवा वडिलांचे फोटो प्रचारसाहित्या

  • महिला उमेदवारांच्या नावासमोर पुरुषांचे फोटो पाहून मतदारही चक्रावले

View All
advertisement