Mumbai News : धक्कादायक! 52 वर्षीय महिलेने इमारतीच्या 14व्या मजल्यावरुन उडी मारुन संपवलं आयुष्य; नेमकं काय घडलं?

Last Updated:

Malad East Incident : मुंबईतील मालाड पूर्व परिसरात 52 वर्षीय गृहिणीने इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

News18
News18
मुंबई : मुंबईतील मालाड पूर्व परिसरात सोमवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. एका 52 वर्षीय गृहिणीने आपल्या राहत्या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
नेमकं काय कारण ठरलं?
फातिमा तुर्की असे या महिलेचे नाव आहे. ती मालाड पूर्वेकडील एका इमारतीत आपल्या कुटुंबासोबत राहत होती. फातिमा तुर्की या मानसिक तणावाखाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ती आपल्या दोन मुलं आणि एका मुलीसह राहत होती.
सोमवारी सकाळच्या सुमारास तिने अचानक इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी तत्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. जखमी अवस्थेत तिला तातडीने जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच तातडीनेदिंडोशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : धक्कादायक! 52 वर्षीय महिलेने इमारतीच्या 14व्या मजल्यावरुन उडी मारुन संपवलं आयुष्य; नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement