Pune News: पुणेकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका; 2 नवीन महामार्ग प्रकल्पांना हिरवा कंदील

Last Updated:

पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या पायाभूत सुविधा विकासाला मोठा वेग मिळताना दिसत आहे.

News18
News18
पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या पायाभूत सुविधा विकासाला मोठा वेग मिळताना दिसत आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (MSIDC) पुणे जिल्ह्यातील दोन महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्पांना पुढे नेण्यासाठी आणखीन दोन प्रकल्पांची भर पडली आहे. तळेगाव- चाकण- शिक्रापूर महामार्ग आणि हडपसर- यवत महामार्ग अशा दोन प्रमुख मार्गांमुळे पुणे आणि परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
या दोन्ही प्रकल्पांसाठी निविदा प्रक्रियेतील अडथळे दूर झाले असून लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. निविदा मंजूर झाल्यानंतर एका महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन MSIDC कडून आखण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही प्रकल्पांची जबाबदारी मोंटेकार्लो लिमिटेड या कंपनीकडे देण्यात आली आहे. तळेगाव- चाकण- शिक्रापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 D असून या मार्गाच्या दुरुस्ती आणि उन्नतीकरणाचे काम दोन टप्प्यांत राबवले जाणार आहे. एकूण सुमारे 53.200 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यापैकी 24.200 किलोमीटरचा भाग उन्नत मार्गिकेच्या स्वरूपात असणार आहे, तर उर्वरित रस्ता जमिनीवर विकसित केला जाणार आहे.
advertisement
औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा असलेला हा मार्ग वाहतूक सुलभ करण्यात मोलाची भूमिका बजावणार आहे. यासोबतच हडपसर- यवत या मार्गावरही मोठ्या प्रमाणात सुधारणा केली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत सहा पदरी उन्नत महामार्ग उभारण्यात येणार असून त्याचसोबत सध्याच्या रस्त्याचेही सहा पदरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे पुणे- सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्रकल्पांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असून, मान्यता मिळताच कामांना गती दिली जाईल. आगामी दोन ते तीन वर्षांत हे रस्ते वाहनचालकांसाठी खुले करण्याचे उद्दिष्ट समोर आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका; 2 नवीन महामार्ग प्रकल्पांना हिरवा कंदील
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement