IND vs ENG : 'त्याने एक रात्र वाट पाहिली', टीम इंडियाचा माजी कॅप्टन संतापला, पंत आणि राहुलला चांगलंच झापलं!

Last Updated:

Anil Kumble On Rishabh Pant wicket : माजी भारतीय कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी पंतच्या रनआऊटवर भाष्य केलं आहे. जिओ हॉटस्टारशी बोलताना त्यांनी धाव घेण्याच्या वेळेवर आणि निर्णयावर टीका केली.

Anil Kumble On Rishabh Pant wicket
Anil Kumble On Rishabh Pant wicket
Anil Kumbale On Rishabh Rahul : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटी मॅचमध्ये आपल्या बोटाला दुखापत होऊनही ऋषभ पंतने (Rishabh Pant) कमाल बॅटिंग केली. दुखापतग्रस्त असताना देखील ऋषभने आपली बाजू कमी पडू दिली नाही अन् एका बाजूने ऋषभ धावा कोरत राहिला. बेन स्टोक्सच्या बॉलवर सिक्स मारून त्याने अर्धशतक पूर्ण केलं. जेव्हा दुपारच्या जेवणाची (lunch) वेळ जवळ येत होती, तेव्हा असं वाटलं होतं की तो केएल राहुलसोबत (KL Rahul) चांगली पार्टनरशिप करेल. पण एक चूक झाली अन् ऋषभला विकेट गमवावी लागली.

ऋषभ आणि राहुलवर सडकून टीका

शोएब बशीरच्या बॉलवर रन घेण्याची घाई त्याला महागात पडली. राहुलला स्ट्राईक देण्याच्या नादात ऋषभ रनआऊट झाला. तो रन आऊट होताच, लगेच दुपारच्या जेवणाची घोषणा झाली. या विकेटमुळे इंग्लंडला दुसऱ्या सत्रात पुन्हा जोर पकडण्याची संधी मिळाली. यामुळे आता टीम इंडियाचा माजी कॅप्टन अनिल कुंबळे याने ऋषभ आणि राहुल यांच्यावर सडकून टीका केली.
advertisement

काय म्हणाला अनिल कुंबळे?

मला वाटतं की रिषभ पंतने आधी धाव घेण्याचा विचार केला, पण नंतर त्याला वाटलं की धाव मिळणार नाही. पण जेव्हा केएल राहुल क्रीझमधून बाहेर आला, तेव्हा रिषभ पंतला धाव घ्यावी लागली. खरं तर ती धाव घेण्याची गरज नव्हती. तो अजून तीन बॉल थांबून जेवणासाठी जाऊ शकला असता आणि नंतर खेळ सुरू करू शकला असता, असं अनिल कुंबळे म्हणाला.
advertisement

"त्याला रात्रभर वाट पहावी लागली"

याची काहीच गरज नव्हती. एकदा जो रूट 99 धावांवर होता, तेव्हा त्याला रात्रभर थांबून दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण करावं लागलं होतं. पंत आणि राहुलने खूप चांगली पार्टनरशिप केली होती. पण या धावबादमुळे इंग्लंडला दुसऱ्या सत्रात जाण्यापूर्वी थोडा आत्मविश्वास मिळाला, असंही अनिल कुंबळे म्हणाला आहे.
advertisement
दरम्यान, लंचपूर्वी, रिषभ पंत 112 बॉलमध्ये 74 धावा काढून धावबाद झाला. लंचनंतर लगेचच केएल राहुलने आपलं शतक पूर्ण केलं. पण शतक झाल्यावर लगेचच राहुलही शोएब बशीरच्या बॉलवर 100 धावा काढून आऊट झाला. या दोन महत्त्वाच्या विकेट्समुळे इंग्लंडने मॅचमध्ये जोरदार कमबॅक केलं आणि भारताला 387 धावांवर ऑल आऊट केलं.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : 'त्याने एक रात्र वाट पाहिली', टीम इंडियाचा माजी कॅप्टन संतापला, पंत आणि राहुलला चांगलंच झापलं!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement