AUS vs ENG : वादळी शतकं ठोकलं आणि विजयही मिळवला, पण मॅच संपताच 60,000 चाहत्यांची माफी मागितली,नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पहिल्या टेस्ट सामन्यात ट्रॅविस हेडच्या 123 धावांच्या शतकीय खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर ट्रॅविस हेडने 60 हजार चाहत्यांची माफी मागितली आहे.
Australia vs England : अॅशेस मालिकेतला पहिलाच टेस्ट अवघ्या दोन दिवसात संपला आहे. कारण पहिल्या टेस्ट सामन्यात ट्रॅविस हेडच्या 123 धावांच्या शतकीय खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर ट्रॅविस हेडने 60 हजार चाहत्यांची माफी मागितली आहे. शतकं ठोकून हेडने ही माफी नेमकी का मागितली आहे. हे जाणून घेऊयात.
अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीचा निकाल फक्त दोन दिवसात लागला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 8 विकेटने सनसनाटी विजय मिळून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात इंग्लंडचा डाव फक्त 172 धावांत संपुष्ठात आला होता. त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला फक्त 132 धावात रोखले आणि आघाडी घेतली होती.
Travis Head apologises to Day 3 ticket-holders after he sealed an Australia win inside two days 😅 pic.twitter.com/chYBLhSazj
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 22, 2025
advertisement
इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी करेल असे वाटत होते. मात्र त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली. इंग्लंडचा दुसरा डाव फक्त 164 धावात संपुष्ठात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात विजयासाठी फक्त 205 धावांचे लक्ष्य मिळाले.
त्यानंतर कसोटीत बेझबॉल खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडला त्याच प्रकाराने ऑस्ट्रेलियाने उत्तर दिले.ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट 75 धावांवर गमावली. मात्र सलामीवीर ट्रेव्हिस हेडने टी-20 स्टाइलने फलंदाजी केली. त्याने फक्त 69 चेंडूत शतक पूर्ण केले. अॅशेस मालिकेतील हे सर्वात खास शतक मानले जात आहे. हेडने 83 चेंडूत 4 षटकार आणि 16 चौकारांसह 123 धावा केल्या. हेड बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलिया विजयाच्या जवळ पोहोचला होता. संघाच्या विजयाची औपचारीकता मार्नस लाबुशेनने अर्धशतकी खेळी करत पूर्ण केली.
advertisement
या कारणामुळे मागितली माफी
view commentsअशाप्रकारे हा सामना पार पडला पण ट्रॅविड हेडने माफी का मागितली.तर तिसऱ्या दिवशी या अॅशेस मालिकेचा निकाल जाईल या आशेने तब्बल 60 हजार प्रेक्षकांनी तिकीट काढले होते.पण ऑस्ट्रेलियाने दोनच दिवसात मॅच संपवल्यामुले तिसऱ्या दिवशी सामना पाहायला येणाऱ्या चाहत्यांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे ट्रॅविस हेडने त्या 60 हजार चाहत्यांची माफी मागितली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2025 11:29 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
AUS vs ENG : वादळी शतकं ठोकलं आणि विजयही मिळवला, पण मॅच संपताच 60,000 चाहत्यांची माफी मागितली,नेमकं काय घडलं?


