तोल गेला अन् स्कुटरवरून खाली पडले आणि ट्रक आला, मुंबईजवळील मन विचलित करणारी घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
मयत महेश देसाई हे डोम्स कंपनीत मॅनेजर पदावर होते तर त्यांच्यासोबत चा लवकुश वर्मा हे डोम्स कंपनीत मार्केटिंग पदावर होते.
नालासोपारा: मुंबईजवळील नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नालासोपाऱ्यातील संतोष भवन परिसरात स्कुटी वरून जाणाऱ्या तरुणाचा तोल गेल्याने ट्रकच्या मागील चाकाखाली सापडला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी आाहे. या अपघातानंतर संतप्त लोकांनी ट्रक पेटवून दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारातील संतोष भवन परिसरात दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या भागात खराब रस्त्याने एका तरुणाचा बळी घेतला आहे. महेश देसाई असं मृत तरुणाचं नाव आहे. महेश देसाई हे आपल्या स्कुटीवरून चालले होते. पण अचानक त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडले. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या ट्रक जात होता. महेश देसाई हे ट्रकच्या चाकाखाली सापडून त्यांचा चेंदामेंदा झाला. तसंच त्यांच्या मागे बसलेला लवकुश वर्मा हे गंभीर जखमी झाले.
advertisement
या घटनेनंतर घटनास्थळी लोकांनी धाव घेतली. जखमी लवकुश वर्मा यांना तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवलं आहे. मयत महेश देसाई हे डोम्स कंपनीत मॅनेजर पदावर होते तर त्यांच्यासोबत चा लवकुश वर्मा हे डोम्स कंपनीत मार्केटिंग पदावर होते. अपघातानंतर ड्रायव्हर पळून गेला होता. त्यामुळे संतप्त लोकांनी ट्रकची तोडफोड केली. त्यावेळी काही अज्ञात तरुण मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी ट्रकला पेटवून दिलं.
advertisement
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी महेश देसाई यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणात ट्रक ड्रायव्हर फरार झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहे. मात्र, ट्रकला आग ही आग ट्रक चालकाच्या माणसांनीच लावली असल्याचा आरोप करण्यात स्थानिकांनी केला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहे.
view commentsLocation :
Vasai-Virar City,Thane,Maharashtra
First Published :
November 22, 2025 10:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तोल गेला अन् स्कुटरवरून खाली पडले आणि ट्रक आला, मुंबईजवळील मन विचलित करणारी घटना


