IND vs PAK : मॅचच्या काही तासआधी भारतासाठी धोक्याची घंटा, 4 भारतीय खेळाडूंमुळे सूर्याचं टेन्शन वाढलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानची धुलाई केल्यानंतर आता सुपर-4 स्टेजसाठीही टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा दुबईच्याच मैदानात सामना होणार आहे.
दुबई : ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानची धुलाई केल्यानंतर आता सुपर-4 स्टेजसाठीही टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा दुबईच्याच मैदानात सामना होणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने तीनही सामने जिंकले, त्यामुळे टीम इंडियासाठी फॉर्म हा चिंतेचा विषय नाही, पण काही कारणांमुळे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीरचं टेन्शन वाढलं आहे.
ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने आधी युएई आणि मग पाकिस्तानला धूळ चारली, पण ओमानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला झगडावं लागलं. या सामन्यात भारतीय बॅटर 250 रन करतील, अशी अपेक्षा केली जात होती, पण त्यांना 200 रनही करता आले नाहीत. या सामन्यात टीम इंडियाने पहिल्या 5 विकेट फक्त 130 रनवरच गमावल्या होत्या.
advertisement
गिल आणि दुबेची कमजोरी
टीमचा उपकर्णधार शुभमन गिलला ओमानचा फास्ट बॉलर शाह फैजलने बोल्ड केलं होतं. फैजलचा लेंथ बॉल खेळताना गिल पूर्णपणे चुकला. तर शिवम दुबेही लेंथ बॉलवर चुकीचा शॉट मारून आऊट झाला. अभिषेक शर्माही लेंथ बॉलवरच मोठा शॉट मारण्याच्या नादात पॅव्हेलियनमध्ये परतला, तसंच हार्दिक पांड्यालाही मोठा स्कोअर करता आला नाही, त्यामुळे टीम इंडियाच्या बॅटिंगच्या या कमजोरीचा अभ्यास पाकिस्तानी बॉलरनी नक्कीच केला असेल.
advertisement
भारताची बॉलिंगही अपयशी
ओमानविरुद्धच्या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताने 20 ओव्हरमध्ये 188 रन केल्या. यानंतर 189 रनचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ओमानने 167 रन करून फक्त 4 विकेट गमावल्या. कुलदीप यादव आणि शिवम दुबेवर ओमानच्या बॅटरनी आक्रमण केलं, त्यामुळे टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांचा खेळ सुधारावा लागणार आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय टीममध्ये दोन बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्शदीप सिंगऐवजी जसप्रीत बुमराह आणि हर्षीत राणाऐवजी वरुण चक्रवर्तीचं भारतीय टीममध्ये कमबॅक होऊ शकतो.
advertisement
भारतीय टीम
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमरा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 6:16 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : मॅचच्या काही तासआधी भारतासाठी धोक्याची घंटा, 4 भारतीय खेळाडूंमुळे सूर्याचं टेन्शन वाढलं!