पाकिस्तानी गायिकेच्या लता मंगेशकरही होत्या जबरी फॅन, भारत-पाक सीमेवर मिठी मारून ढसाढसा रडल्या

Last Updated:
Lata Mangeshkar : तुम्हाला माहित आहे का, सर्वांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर एका पाकिस्तानी गायिकेच्या फॅन होत्या. कोण होत्या त्या?
1/10
भारताच्या गानकोकिळा म्हणून लोकप्रिय असलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आपल्या देशातच नाही, तर जगभरातही मोठी फॅन फॉलोविंग आहे.

advertisement
2/10
त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत जवळपास ५० हजार गाणी गायली असून १९७० च्या दशकात गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांच्या २५,००० गाण्यांची नोंद केली होती. त्यांच्या नावावर इतिहासातील सर्वाधिक रेकॉर्ड केलेल्या कलाकाराचा विक्रम आहे.

3/10
पण तुम्हाला माहित आहे का, सर्वांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या लता एका पाकिस्तानी गायिकेच्या फॅन होत्या. कोण होत्या त्या?

4/10
‘स्वर कोकिळा’ लता मंगेशकर ज्यांच्या आवाजाच्या खूप मोठ्या चाहते होत्या, त्या होत्या पाकिस्तानच्या प्रसिद्ध गायिका नूरजहाँ. त्यांनी त्यांच्या आवाजाने फक्त पाकिस्तानातच नाही, तर भारतातही खूप नाव कमावलं. त्यांनी तब्बल १०,००० पेक्षा जास्त गाणी गायली आणि लोकांच्या मनावर राज्य केलं.

5/10
नूरजहाँ, ज्यांना ‘मलिका-ए-तरन्नुम’ म्हटलं जातं, त्या आधी भारतीय चित्रपटांत गात आणि अभिनय करत होत्या. त्यांचा आवाज ऐकून लता मंगेशकर भारावून गेल्या आणि गायनाकडे अधिक गांभीर्याने पाहू लागल्या.

6/10
लता यांनी स्वतः मान्य केलं होतं की, “नूरजहाँ माझी खरी प्रेरणा आहेत.” नूरजहाँच्या आवाजातील गोडवा आणि ताकद लता यांना नेहमी मंत्रमुग्ध करायची.

7/10
१९४७ च्या फाळणीनंतर नूरजहाँ पाकिस्तानात स्थायिक झाल्या, पण यामुळे त्यांच्या मैत्रीत दरी निर्माण झाली नाही. दोघींचं नातं पत्रांमधून, आठवणींमधून आणि सुरांच्या ओघातून जिवंत राहिलं.

8/10
याचं सर्वात हृदयस्पर्शी उदाहरण म्हणजे १९५१ मध्ये सीमेवर झालेली त्यांची भेट. दोघी एकमेकींना पाहताच आवरू शकल्या नाहीत आणि ढसाढसा रडल्या. तो क्षण पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. संगीताच्या दोन महान स्वरांचा तो भावनिक मिलाफ आजही संगीतप्रेमींना अंगावर शहारे आणतो.

9/10
नूरजहाँ आणि लता मंगेशकर यांच्या मैत्रीमध्ये कुठेही हेवा किंवा स्पर्धा नव्हती, उलट एकमेकींना पुढे नेणारं, प्रोत्साहन देणारं नातं होतं. हेच त्यांचं वेगळेपण होतं. दोघींचा आवाज, दोन देश, दोन पिढ्या पण त्यांचं हृदय मात्र एकमेकांशी नितांत जुळलेलं होतं.

10/10
२३ डिसेंबर २००० रोजी नूरजहाँ यांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा लता मंगेशकर अतिशय भावुक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, “मी माझी बहीण गमावली.” हे वाक्य त्यांच्या नात्याची खोली सांगून जातं.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement