IND vs PAK सामन्यात चीड आणणार कृत्य ,144 कोटी जनतेच्या डोक्यात तीव्र सणक जाणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आशिया कप 2025 च्या सुपर 4 मध्ये आज भारत पाकिस्तान पुन्हा भिडणार आहेत. हे दोन्ही कट्ट्रर प्रतिस्पर्धी पुन्हा समोर येत असल्याने वाद पेटण्याची शक्यता आहे.
India vs Pakistan, Asia Cup 2025 : आशिया कप 2025 च्या सुपर 4 मध्ये आज भारत पाकिस्तान पुन्हा भिडणार आहेत. हे दोन्ही कट्ट्रर प्रतिस्पर्धी पुन्हा समोर येत असल्याने वाद पेटण्याची शक्यता आहे. काल गेल्याच सामन्यात हँडशेक वरून मोठा वाद झाला होता. टीम इंडिया सामना संपल्यानंतर पाकिस्तान संघातसोबत हँडशेक टाळली होती. त्यामुळे पाकिस्तान भारतावर नियमांच भंग केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे आज पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. त्यामुळे सुर्याला कदाचित पाकिस्तानी कर्णधार सलमान आगासोबत हॅडशेक करावीच लागणार आहे.त्यामुळे असे जर झाल्यास भारताच्या 144 कोटी जनतेच्या डोक्यात तीव्र सणक जाणार आहे.
खरं तर साखळी फेरीतील सामन्यात पंच अँडी पायक्राफ्टच्या आदेशानंतर टॉस दरम्यान भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाला हॅन्डशेक करण्याचे टाळण्यास सांगितले होते. त्यानंतर सामना जिंकल्यानंतर देखील भारताने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हँडशेक टाळला होता. खरं तर पाकिस्तान खेळाडू वाट पाहत होते, पण भारतीय संघाने थेट ड्रेसिंग रूम गाठली होती.त्यामुळे पाकिस्तान रागाने लालबुंद झाला होता.
advertisement
भारताच्या या कृतीनंतर पाकिस्तान संघाने खूप आकाडतांडव केला होता. पाकिस्तानने पंच अँडी पायक्राफ्ट यांना काढून टाकण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. पण आयसीसीने त्यांची ही मागणी फेटाळून लावत मोठा धक्का दिला होता. यासोबत भारताने नियमाचा भंग केल्याचा आरोप करत कारवाईचीही मागणी केली होती.पण अद्याप तरी भारतावर कोणतीही कारवाई झालेली नाही आहे.
advertisement
दरम्यान आज पुन्हा सुपर 4 मध्ये हे दोन संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यात पुन्हा एकदा हँडशेकवरून वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तान संघ हा हँडशेक करण्यावरून आग्रही राहणार आहे.भारताने यावेळी कितीही नकार दिला तरी पाकिस्तान अडूनच राहणार आहे. त्यामुळे नाईलाजास्तवर जर भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादवला हँडेशक करायला लावला तर भारतीयांच्या तळपायाची आग मस्तकात जाणार आहे. पण जर या विपरीत घडल्यास चाहत्यांना नक्कीच आवडेल.त्यामुळे आजच्या सामन्यात नवीन काय ड्रामा घडतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
भारताचा संघ - सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमरा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा.
पाकिस्तानचा संघ - सलमान अली आगा (कॅप्टन), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रॉफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सॅम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी आणि सुफियान मोकीम.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 4:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK सामन्यात चीड आणणार कृत्य ,144 कोटी जनतेच्या डोक्यात तीव्र सणक जाणार