आमच्याकडे खरंच तशी माहितीच नव्हती... आयुषच्या खुनाविषयी पुणे पोलीस आयुक्तांची मोठी कबुली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pune CP Amitesh Kumar interview: आंदेकर आणि कोमकर यांच्या टोळीची गुन्हा करण्याची पद्धत (मोडस ऑपरेंडी) माहिती असतानाही आयुषची हत्या होऊ शकते, याची कल्पना किंबहुना तशी माहिती पुणे पोलिसांकडे कशी नव्हती? असे सवाल पुणे पोलिसांना विचारले गेले.
पुणे : आंदेकर कोमकर यांच्या टोळीयुद्धात महाविद्यालयीन तरुण आयुष कोमकरची ऐन गणेशोत्सवात हत्या झाल्याने पुणे शहर हादरून गेले. पुण्यात गणेशोत्सवाचा माहोल उत्तरोत्तर रंगत असताना वनराज आंदेकरच्या हत्येला वर्ष पूर्ण व्हायच्या आत बदला म्हणून आयुषचा खून करण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती भागात टोळीयुद्धातून एका महाविद्यालयीन तरुणाचा खून झाल्याने पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर भरपूर टीका झाली. आंदेकर आणि कोमकर यांच्या टोळीची गुन्हा करण्याची पद्धत (मोडस ऑपरेंडी) माहिती असतानाही आयुषची हत्या होऊ शकते, याची कल्पना किंबहुना तशी माहिती पुणे पोलिसांकडे कशी नव्हती? असे सवाल पुणे पोलिसांना विचारले गेले. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबद्दलच मोठी कबुली दिली आहे.
पुण्यातील भडकलेल्या टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 'बोल भिडू'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत राज्यात चर्चेत असलेले आंदेकर कोमकर यांच्यातील टोळीयुद्ध, आंदेकर टोळीची मोडस ऑपरेंडी, गेल्या वर्षी पुण्यात घडलेले पोर्शे प्रकरण, पुण्यातील नाईट लाईफ, नव तरुणांना गुन्हेगारी वर्तुळाबद्दल वाढलेले आकर्षण अशा विविध मुद्द्यांवर अमितेश कुमार यांनी उत्तरे दिली.
advertisement
आमच्या गुप्तचर यंत्रणेकडे खरंच तशी माहितीच नव्हती...
अमितेश कुमार म्हणाले, मागच्या दीड वर्षांत पोलिसांनी खरंच टोळ्यांवर जबरदस्त पद्धतीने कारवाई केली आहे. कधी कधी पोलिसांच्या कारवायांना माध्यमे फार प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे सामान्य पुणेकरांपर्यंत त्याबद्दलची माहिती पोहोचत नाही. मागच्या एक वर्षापासून व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न आंदेकर टोळीकडून केला जात होता. आमच्या व्यक्तीवर हल्ला झाला, वनराजची काहीही चूक नसताना त्याला मारले, असे आंदेकर टोळी सांगण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे कारवाई करताना पोलिसांना सावध राहणे गरजेचे होते. शेवटी पीडित आणि साक्षीदारांची बाजू ऐकून घेणे ही देखील पोलिसांची जबाबदारी असते. या टोळीतील व्यक्तींचा गेल्या एक वर्षापासून वनराजच्या हत्येचा केसमुळे जास्त संबंध आल्याने आमची त्यांच्यावर अत्यंत बारकाईने नजर होती.
advertisement
परंतु आंदेकर टोळीकडून सातत्याने व्हिक्टिम कार्ड खेळण्यात येत असल्याने आम्ही सावध होतो. आंदेकर टोळी प्रत्युत्तरादाखल काहीतरी करू शकते, याची माहिती आम्हाला मिळालेली होती. किंबहुना आम्हाला त्याची कल्पना देखील होती. त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय देखील आमच्याकडून केले गेले होते. परंतु टोळीयुद्धाच्या वादात सख्ख्या नातवालाच मारतील, हे आम्हाला अजिबातच अपेक्षित नव्हते, आमच्या गुप्तचर यंत्रणेकडे खरंच तशी माहितीच नव्हती, अशी कबुली देऊन बंडू आंदेकर टोळीचे क्रौर्याची परिसीमा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधोरेखित केले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 21, 2025 3:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आमच्याकडे खरंच तशी माहितीच नव्हती... आयुषच्या खुनाविषयी पुणे पोलीस आयुक्तांची मोठी कबुली