'लग्न करेन, तर तिच्याशीच...' फ्लॉप हिरोईनच्या प्रेमात पडला डायरेक्टर, अभिनेत्रीने इंडस्ट्री सोडून सुरू केलं 'हे' काम

Last Updated:
Bollywood Director Love Story : लोकप्रिय दिग्दर्शकाने त्याच्या या वर्षी सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांबद्दल बोलताना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही काही खुलासे केले.
1/8
 मुंबई: बॉलिवूडमध्ये अनेक दिग्दर्शक आहेत, पण त्यापैकी काहीच त्यांच्या लव्ह स्टोरीसाठी ओळखले जातात. त्यातलाच एक म्हणजे मोहित सूरी.

advertisement
2/8
 नुकताच त्याचा ‘सैयारा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

3/8
 या चित्रपटाच्या यशाबद्दल बोलत असतानाच, मोहितने त्याची पत्नी उदिता गोस्वामीसोबतच्या लव्ह स्टोरीचा एक खूपच खास किस्सा सांगितला आहे.

4/8
 मोहित सूरी नुकताच एका कार्यक्रमात त्याच्या ‘सैयारा’ चित्रपटाबद्दल बोलत होता. तेव्हा त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही काही खुलासे केले. तो म्हणाला, “माझ्या आयुष्यातील सर्वात खास क्षण तो होता, जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या पत्नी उदिताला भेटलो. मला खरं प्रेम मिळालं होतं.”

5/8
 तो पुढे म्हणाला, “मी उदिताचा फोटो एका बिलबोर्डवर पाहिला आणि त्याच क्षणी ठरवलं की, मी याच मुलीसोबत लग्न करेन. मी त्यावेळी एक असिस्टंट डायरेक्टर होतो.”

6/8
 मोहितने उदिताला भेटण्यासाठी खूप प्रयत्न केले. २००५ मध्ये ‘जहर’ चित्रपटाच्या सेटवर ते दोघे पहिल्यांदा भेटले आणि त्यांची मैत्री झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. तब्बल ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर २०१३ मध्ये दोघांनी लग्न केलं आणि आता त्यांना दोन मुलं आहेत.

7/8
 मोहितसोबत लग्न केल्यानंतर उदिताने अभिनय सोडून दिला. ती आता एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. उदिता आता एक डीजे म्हणून काम करते.

8/8
 मोहित आणि उदिताची प्रेमकहाणी आज अनेक तरुण-तरुणींसाठी एक उदाहरण बनली आहे. आजही त्यांच्यात पहिल्या भेटीसारखं प्रेम आहे.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement