IND vs PAK : भारताविरुद्धच्या मॅचआधी पाकिस्तानी खेळाडू भयंकर घाबरले, ड्रेसिंग रूममधील बातमी फुटली
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध झालेल्या पराभवाच्या दबावातून सावरण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे. ग्रुप स्टेजनंतर आता सुपर-4 मध्येही भारत-पाकिस्तान आमने-सामने येत आहेत.
दुबई : आशिया कपमध्ये भारताविरुद्ध झालेल्या पराभवाच्या दबावातून सावरण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे. ग्रुप स्टेजनंतर आता सुपर-4 मध्येही भारत-पाकिस्तान आमने-सामने येत आहेत, पण या सामन्याआधी पाकिस्तानची टीम भयंकर दबावामध्ये असल्याचं दिसत आहे. भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. राहिल करीम यांना टीममध्ये सामील केलं आहे.
भारताविरुद्ध 7 विकेटने झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी टीम प्रचंड दबावाखाली आहे आणि खेळाडूही घाबरले आहेत. भारताविरुद्धच्या मागच्या 14 टी-20 सामन्यांमधला पाकिस्तानचा हा 11वा पराभव आहे, त्यामुळे टीमला मानसिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी डॉ. राहिल करीम पाकिस्तानी टीममध्ये सामील झाले आहेत.
डॉ. राहिल करीम यांच्याकडे एक दशकाहून अधिक काळ क्रीडा तसंच इतर क्षेत्रातील टीमसोबत काम करण्याचा अनुभव आहे. बुधवारी डॉ. राहिल करीम पाकिस्तानच्या टीममध्ये सामील झाले. आशिया कप संपेपर्यंत राहिल करीम पाकिस्तानच्या टीमसोबत राहतील. खेळाडूंना तणावातल्या मॅचचा सामना करण्यास मदत करणे तसंच नकारात्मकतेपासून दूर ठेवणं, हे राहिल करीम यांचं मुख्य काम असेल.
advertisement
पाकिस्तानी खेळाडू सोशल मीडियापासून दूर
मीडियाच्या प्रश्नापासून खेळाडूंना लांब ठेवण्यासाठी पीसीबीने मॅचआधीची पत्रकार परिषदही रद्द केली. हस्तांदोलन वाद आणि मागच्या पराभवानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाबद्दल प्रश्न टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानचा अगदी सहज पराभव केला, त्यानंतर आता सुपर-4 मध्येही दोन्ही टीमची लढत होणार आहे. आशिया कपमधील आव्हान टिकवण्यासाठी तसंच मागच्या पराभवाचा बदला घेण्याची संधी म्हणून पाकिस्तान या सामन्याकडे पाहत असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 6:58 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : भारताविरुद्धच्या मॅचआधी पाकिस्तानी खेळाडू भयंकर घाबरले, ड्रेसिंग रूममधील बातमी फुटली