IND vs BAN : सुपर ओव्हरमध्ये 3 विकेट, दोन्ही टीमनी एकही रन काढली नाही, तरी बांगलादेशने भारतावर कसा मिळवला विजय?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कप रायजिंग स्टारमध्ये बांगलादेशने भारतावर सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय मिळवला आहे. सुपर ओव्हरमध्ये भारत आणि बांगलादेशच्या बॅटरनी एकही रन काढली नाही, तरी बांगलादेशचा विजय झाला आहे.
दोहा : आशिया कप रायजिंग स्टारमध्ये बांगलादेशने भारतावर सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय मिळवला आहे. सुपर ओव्हरमध्ये भारत आणि बांगलादेशच्या बॅटरनी एकही रन काढली नाही, तरी बांगलादेशचा विजय झाला आहे. बांगलादेशने पहिले बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 194/6 एवढा स्कोअर केला, त्यानंतर इंडिया ए लाही 20 ओव्हरमध्ये 194/6 एवढाच स्कोअर करता आला, त्यामुळे मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली.
सुपर ओव्हरमध्ये इंडिया ए पहिले बॅटिंगला आली, तेव्हा कर्णधार जितेश शर्मा आणि रमणदीप सिंग मैदानात उतरले. तर बांगलादेशने रिपोन मोंडलला बॉलिंग दिली. सुपर ओव्हरचा पहिलाच बॉल मोंडलने यॉर्कर टाकला आणि जितेश शर्मा बोल्ड झाला. यानंतर आशुतोष शर्मा बॅटिंगला आला, पण तोदेखील मोठा शॉट मारण्याच्या नादात एक्स्ट्रा कव्हरला कॅच देऊन बसला. टीम इंडियाने पहिल्या दोन बॉलवर एकही रन न काढता दोन्ही विकेट गमावल्या, त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी फक्त एक रनचं आव्हान मिळालं.
advertisement
सुपर ओव्हरमध्ये एक रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी बांगलादेशकडून यासिर अली आणि झिशान आलम बॅटिंगला उतरले, तर भारताने लेग स्पिनर सुयश शर्माकडे बॉल दिला. पहिल्याच बॉलला सुयश शर्माने यासिर अलीची विकेट घेतली, रमणदीपने यासिर अलीची विकेट घेतली. यासिर अली आऊट झाल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार अकबर अली बॅटिंगला आला, तेव्हा सुयश शर्माने वाईड बॉल टाकला, ज्यावर जितेश शर्माने स्टम्पिंग सोडला. अंपायरने वाईड बॉल दिल्यामुळे बांगलादेशचा सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय झाला.
advertisement
सुपर ओव्हरमध्ये इंडिया ए आणि बांगलादेश ए ला बॅटने एकही रन काढता आली नाही, तर दोन्ही टीमनी 3 विकेट गमावल्या. अखेर एका वाईड बॉलमुळे या मॅचचा निकाल लागला. या पराभवासह टीम इंडियाचं आशिया कप रायजिंग स्टार स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. तर बांगलादेश ए स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे.
शेवटच्या ओव्हरमध्ये 16 रन
advertisement
या सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी 16 रनची गरज होती, पण 15 रनच काढता आल्यामुळे मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला आशुतोष शर्माने तर दुसऱ्या बॉलला नेहल वढेराने एक-एक रन काढली, यानंतर आशुतोषने तिसऱ्या बॉलला सिक्स मारला. ओव्हरच्या चौथ्या बॉलला बांगलादेशच्या फिल्डरने बाऊंड्री लाईनवर आशुतोषचा सोपा कॅच सोडला, त्यामुळे भारताला चार रन मिळाल्या. पण पाचव्या बॉलला आशुतोष आऊट झाला, त्यामुळे शेवटच्या बॉलवर भारताला विजयासाठी 4 रनची गरज होती. बांगलादेशच्या गचाळ फिल्डिंगमुळे हर्ष दुबेने शेवटच्या बॉलला 3 रन काढले, ज्यामुळे सामना टाय झाला आणि सुपर ओव्हरमध्ये मॅचचा निकाल लागला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2025 7:24 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs BAN : सुपर ओव्हरमध्ये 3 विकेट, दोन्ही टीमनी एकही रन काढली नाही, तरी बांगलादेशने भारतावर कसा मिळवला विजय?


