ओजसचा सुवर्णवेध आणि उपराजधानीत जल्लोष, ही कामगिरी करणारा एकमेव भारतीय, Video

Last Updated:

नागपूरकर ओजस देवतळे यानं आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसऱ्यांदा सुवर्ण कामगिरी केलीय. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय तिरंदाज ठरलाय.

+
ओजसचा

ओजसचा सुवर्णवेध आणि उपराजधानीत जल्लोष, ही कामगिरी करणारा एकमेव भारतीय, Video

नागपूर, 7 ऑक्टोबर: भारताच्या क्रीडा विश्वात नवा इतिहास रचला गेला आहे. नागपूरकर 21 वर्षीय युवा तिरंदाज असलेल्या ओजस देवतळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक मिळवून आपल्या नावे नवा विक्रम नोंदविला आहे. सध्या चीन मध्ये सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ओजसने तिरंदाजी कंपाउंडमध्ये भारताच्या अभिषेक वर्माविरोधात हा विजय मिळवला आहे.
ओजसचा सुवर्णवेध
सध्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू असून भारताने पदकांची लयलूट केलीय. आज दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.10 मिनिटाला वैयक्तिक प्रकारात तिरंदाजी स्पर्धा झाली. या वैयक्तिक सुवर्ण लढतीत ओजसने आपलाच सहकारी असलेल्या अभिषेक वर्मा याच्या विरोधात सुवर्णवेध घेतला. त्यामुळे त्याने तिसऱ्यांदा सोनेरी यशाला गवसणी घातली आहे.
नागपुरात जल्लोष
ओजसच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर नागपूरमध्ये त्याच्या राहत्या घरी दिवाळी साजरी केली जात आहे. तसेच सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ओजसने याआधी आशियाई क्रीडा स्पर्धेत टीम कंपाऊंड आणि मिक्स टीम कंपाऊंडमध्ये सुवर्ण पदक पटकावलंय. ओजस आणि अभिषेकच्या या सुवर्ण आणि रौप्य पदकांमुळे भारताची मेडलची टॅली 100 च्या वर गेलीय. ओजसच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशाच्या क्रीडा विश्वात एकच जल्लोष होताना दिसतोय.
advertisement
भारताची सर्वोत्तम कामगिरी
यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. भारताने आशियाई स्पर्धेत एक दोन नव्हे तर तब्बल 100 पदके जिंकत आजवरचा मोठा विक्रम आपल्या नावे प्रस्थापित केला आहे. एकापाठोपाठ एक पदकं जिंकत भारताने 25 सूवर्ण पदकांची लयलूट केली आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे आशियाई स्पर्धेत भारताचा दबदबा वाढला आहे.
advertisement
ओजसची ऐतिहासिक कामगिरी
आशियाई स्पर्धेत पदकांची लयलूट करण्याचं स्वप्न भारताने पाहिलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण झालं आहे. अश्यातंच उपराजधानी नागपूरच्या मराठमोळ्या ओजस देवताळे ने कंम्पाउंड तिरंदाजीतील मिश्र सांघिक आणि त्यानंतर पुरुष सांघिक गटात सुवर्ण जिंकल्यानंतर अखेरच्या दिवशी वैयक्तिक गटात सुवर्णपदक मिळवून मोठा भीम पराक्रम केला आहे. ओजसने कंपाऊंड तीरंदाजीत प्रत्येकी एक सूवर्णपदक पटकावलं असून भारतीय क्रीडा विश्वातील 92 वर्षाच्या कालखंडात अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
advertisement
विश्वास सार्थ ठरवला
ऑरेंज सिटीची शान असलेला 21 वर्षीय युवा विश्वविक्रमी तिरंदाज ओजस देवतळे यांच्या नागपुआतील राहत्या घरी सकाळपासूनच क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळत आहे. ओजसचे कुटुंबीय, मित्रमंडळी व आप्तस्वकीय यांनी एकत्र येत हा ऐतिहासिक क्षण अनुभवाला. ओजसची आई अर्चना देवताळे व वडील प्रवीण देवतळे यांना पूर्ण विश्वास होता की, आपला मुलगा या खेळात दमदार कामगिरी करेल. त्यामुळे सकाळपासूनच त्यांनी या विजयोत्सवाची तयारी केली होती. याविषयी त्यांनी आपली भावना व्यक्त करत असताना त्यांचे अश्रू अनावर झाले आणि या यशाचे सर्वस्वी श्रेय हे ओजसच्या मेहनत, जिद्द आणि परिश्रमाचे आहे. त्यांचे क्रीडा प्रशिक्षक, मित्रपरिवार, कुटुंबीय यांच्या प्रेम आशीर्वाद आणि सहकार्य यांच्या मुळे ओजस ही मजल गाठू शकला, अशी भावना ओजसच्या आई अर्चना देवतळे यांनी बोलताना व्यक्त केली
advertisement
आई-वडिलांचं योगदान
ओजसला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. त्यामुळे आई-वडिलांनी त्याला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. ओजसचे वडील प्रवीण देवतळे व्यावसायिक असून आई अर्चना देवताळे या स्वतःची खासगी शाळा चालवतात. तिरंदाजी हा महागडा खेळ असून सुद्धा त्याच्या घरच्यांनी त्याला आवश्यकता असताना प्रत्येक वेळी क्रीडा साहित्य घेऊन दिले, त्यामुळे मुलाने तिरंदाजी खेळात जे काही कमावले त्यात त्याच्या आई-वडिलांचं सुद्धा तितकंच योगदान आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ओजसचा सुवर्णवेध आणि उपराजधानीत जल्लोष, ही कामगिरी करणारा एकमेव भारतीय, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement